Rahul Dravid: टीम इंडियाचा कोच होण्यास राहुल द्रविड तयार, 2023 पर्यंत होऊ शकतो करार
Team India Coach: भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे.
Team India Coach: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे.. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार काल दुबईत झालेल्या आयपीएल फायनल सामन्यादरम्या बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआचा अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडसोबत बैठक केली. या बैठकीत राहुल द्रविडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, बोर्ड त्याला काय ऑफर देऊ इच्छिते.
CSK Won IPL 2021: चेन्नईचा दबदबा, फायनल सामन्यानंतर चेन्नईच्या नावावर अनेक विक्रम
2023 पर्यंत होऊ शकतो करार
काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडनं टीम इंडियाचा कोच होण्यास नकार दिला होता. बीसीसीआयनं त्याला प्रशिक्षक करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. अखेर बीसीसीआयच्या प्रयत्नाला यश मिळत असल्याचं दिसत आहे. द्रविडनं होकार दिला असला तरी अद्याप बीसीसीआयकडून कुठलीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक होता. या दौऱ्यात शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया वनडे मालिका जिंकली होती.
द्रविडचं युवा खेळाडूंना मार्गदर्शन
निवृत्ती घेतल्यानंतर द्रविडने युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले आहे. तो 2016 पासून अंडर-19 टीमचा प्रशिक्षक म्हणून काम केले. त्याच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले तर 2018 मध्ये संघाने अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. द्रविडच्या मार्गदर्शना मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत सारखे खेळाडू तयार झाले आहेत. आता द्रविडवर बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
गोलंदाजी प्रशिक्षकपदी पारस म्हांब्रे
टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी मुंबईचे माजी खेळाडू पारस म्हांब्रे यांनी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.