यानंतर मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर या दोघांशी चर्चा करून सामना अनिर्णीत घोषित केला.
2/6
शेवटच्या सामन्यात केवळ 22 षटकांचा खेळ झाला. यात वेस्ट इंडिज संघाने दोन बाद 62 धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययाने खेळ सुरु होऊ शकला नाही.
3/6
यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि अश्विन यांनी पाचवेळा मालिकावीर बनण्याचा बहुमान मिळवला होता. अश्विनने सहावेळा मालिकावीराची ट्रॉफी जिंकून सचिन आणि सेहवागलाही पिछाडीवर टाकले.
4/6
सहावेळा मालिकावीराचा बहुमान मिळाल्यामुळे, अश्विनने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले.
5/6
सामन्याच्या शेवटच्या दिवशी अवॉर्ड सेरेमनीवेळी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अश्विनला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
6/6
वेस्ट इंडिज विरूद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यावर पावसाने पाणी फिरवल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. या मालिकेदरम्यान भारतीय संघातील स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने नवा विक्रम प्रस्थापित केला.