एक्स्प्लोर
पीव्ही सिंधू फायनलमध्ये, महानायकाचा शोभा डेंना टोला
मुंबई: रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने धडाकेबाज कामगिरी करून विजय मिळवल्यानंतर, तिच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून क्रिडा तसेच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी सिंधूचे अभिनंदन केले आहे. महानायक अमिनाभ बच्चन यानेही पी.व्ही सिंधूचे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन करताना, शोभा डेला सणसणती चपराक लगावली आहे.
प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरून रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडू केवळ सेल्फी काढण्यासाठी जातात असे ट्विट केले होते. त्यावर अमिताभ बच्चन यांनी अप्रत्यक्ष टोलेबाजी केली आहे.
आजच्या उपांत्य फेरीत पी.व्ही सिंधूने विजय मिळवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी, पी. व्ही सिंधू तुम्ही रिकाम्या हाताने नव्हेत तर पदक जिंकूनच मायदेशी परतणार आहात. आणि आम्ही तुमच्या सोबत 'सेल्फी' काढण्यास उत्सुक आहोत. असे ट्वीट केले आहे.
या शिवाय शोभा डे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य करणारे ट्वीटदेखील अमिताभ बच्चन यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी, पी. व्ही. सिंधू तुम्ही बोलणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. कर्म बोलतात, आणि कधीकधी तर ते 'लेखणी'लाही पराभूत करतात, असे म्हटले आहे.T 2352 - #PVSindhu .. aap "khaali haath" nahein, medal leke wapas aa rahein hain .. aur hum aapke saath 'selfie' nikalne chahate hain !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 18, 2016
T 2352 - #PVSindhu ...aapne 'bolne walon' ki bolti bund kar di .. karm bolta hai aur wo kabhi kabhi 'kalam' ko bhi hara deta hai ! BADHAI !! — Amitabh Bachchan (@SrBachchan) August 18, 2016आणखी एका ट्वीटमध्ये बच्चन यांनी महिलाशक्तीचा काहींना अंदाज नसतो. पी. व्ही सिंधू तुम्ही टीकाकारांना उद्धवस्त केले आहे. असं म्हटलं आहे.
T 2352 - Never ever underestimate power of female gender ! #PVSindhu you have destroyed so many 'naysayers' .. you are the PRIDE of INDIA !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 18, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
Advertisement