एक्स्प्लोर

खिळ्याचे शूज घालून पिचवर, कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले?

या स्टिंगमध्ये बॅटिंगसाठी चांगलं पिच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे.

मुंबई/पुणे:  भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आज पुणे वनडे सामन्यावर शंकेचे ढग दाटले आहेत. पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचं धक्कादायक स्टिंग आज तक या वाहिनीने समोर आणल्याने आजचा सामनाच रद्द होण्याची चिन्हं आहेत. या स्टिंगमध्ये बॅटिंगसाठी चांगलं पिच तयार करण्यासाठी पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख आहे. बीसीसीआयनं या वृत्ताची गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तसंच दोषीवर कारवाई करु असंही म्हटलं आहे. दरम्यान पांडुरंग साळगावकरांच्या स्टिंगमुळे आज होणारी मॅचही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅमेऱ्यावर पिच क्युरेटर काय म्हणाले? बुकी बनून गेलेल्या पत्रकारांनी सामन्याआधी पिचसोबत छेडछाड करण्याची परवानगी देताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांना रंगेहाथ पकडलं. मागणीनुसार  पिच बनवून दिलं जाईल, असं साळगावकर कॅमेऱ्यावर बोलले. दोन खेळाडूंना पिचवर बाऊन्स हवाय, हे होऊ शकतं का, असं पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी 'होऊन जाईल,' असं उत्तर दिलं. पत्रकाराने पिच क्युरेटरला आपल्या दोन खेळाडूंसाठी पिचमध्ये काही बदल करण्यास सांगितलं, त्यावर पांडुरंग साळगावकर लगेचच तयार झाले. जे पिच आम्ही तयार केलंय, त्यावर 337 धावसंख्या होऊ शकते. या आव्हानाचा सहजरित्या पाठलाग करता येऊ शकतो, असं पिच क्युरेटर म्हणाले. रिपोर्टरच्या सांगण्यावरुन पांडुरंग साळगावकर त्यांना पिच दाखवण्यासही तयार झाले. मात्र नियमानुसार, सामन्याआधी पिचवर कर्णधार आणि प्रशिक्षकाशिवाय कोणीही जाऊ शकत नाही. तसंच मी काही मिनिटांत पिचचं स्वरुप बदलू शकतो, असंही पिच क्युरेटर म्हणाले. पिचवर जर थोडी माती किंवा पाणी टाकलं किंवा पिचवर बुटं घासली तरी पिच खराब होऊ शकते. इतकंच नाही तर खिळे असलेले शूज घालून पिचवर जाण्यासही त्यांनी परवानगी दिली. https://twitter.com/IndiaToday/status/923058154706944000 कोण आहेत पांडुरंग साळगावकर? पांडुरंग साळगावकर हे माजी रणजीपटू आहेत. 1971-72 ते 1981-82 या कालावधीत महाराष्ट्रासाठी त्यांनी रणजी सामने खेळले. साळगावकरांनी जलदगती गोलंदाज म्हणून रणजी सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. 1971-72 या पदार्पणाच्या रणजी सामन्यांमध्ये साळगावकरांनी 15 विकेट्स घेतल्या होत्या. इराणी कपमध्येही त्यांनी 'रेस्ट ऑफ इंडिया'साठी बॉम्बेविरोधात सामने खेळले आहेत. अजित वाडेकरांसह सहा विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. जानेवारी 1974 मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली होती. 1974-75 मध्ये दलिप ट्रॉफीच्या उपान्त्य सामन्यात इस्ट झोनचा त्यांनी धुव्वा उडवला. 1974-75 नंतर ते फक्त महाराष्ट्रासाठी रणजी खेळले. 1980-81 मध्ये बडोद्याविरुद्ध त्यांनी ठोकलेलं शतक हे त्यांच्या कारकीर्दीचं हायलाईट म्हणता येईल. निवृत्तीनंतर साळगावकर पुण्यात क्रिकेट कोचिंग अकादमी चालवतात. सध्या ते पुण्यातील 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियम'चे मुख्य पीच क्युरेटर आहेत. महाराष्ट्र रणजी टीमचे मुख्य निवडकर्ते म्हणून काम पाहिलं आहे. संबंधित बातम्या पिच क्युरेटर साळगावकरांचं धक्कादायक स्टिंग, आजचा सामना रद्द होणार? पिच क्युरेटरचं स्टिंग, कोण आहेत पांडुरंग साळगावकर?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget