PKL 2022: पाटणा पायरेट्सला हरवून तेलुगू टायटन्सचा पहिला विजय; मोनू गोयत, सिद्धार्थ देसाईची चमकदार कामगिरी
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामातील तेराव्या सामन्यात तेलुगू टायटन्सनं पाटाणा पाररेट्सचा 30-21 असा पराभव केला.
![PKL 2022: पाटणा पायरेट्सला हरवून तेलुगू टायटन्सचा पहिला विजय; मोनू गोयत, सिद्धार्थ देसाईची चमकदार कामगिरी Pro Kabaddi League 2022: Telugu Titans register first win in Season 9 after beating Patna Pirates PKL 2022: पाटणा पायरेट्सला हरवून तेलुगू टायटन्सचा पहिला विजय; मोनू गोयत, सिद्धार्थ देसाईची चमकदार कामगिरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/12/ff9d93905152ebe3ca865dd68b1909b81665559135331266_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामातील 12व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सनं तामिळ थालवायास विरुद्ध विजय मिळवल्यानंतर तेलुगू टायटन्सनं पाटाणा पाररेट्सला (Telugu Titans vs Patna Pirates) पराभवाची धुळ चारली. प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामातील तेराव्या सामन्यात तेलुगू टायटन्सनं पाटाणा पाररेट्सचा 30-21 असा पराभव केला. या हंगामातील पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर तेलुगू टायटन्सनं पहिला विजय नोंदवला. तर, पाटणाचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात तेलुगू टायटन्सनं कर्णधार रविंदर पहलला संघातून वगळ्याचा मोठा निर्णय घेतला होता. या सामन्यात सुरजित सिंहनं तेलुगू टायटन्सच्य संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली.
या सामन्यात तेलुगू टायटन्सची सुरुवात चांगली झाली. सुरुवातीपासूनच तेलुगू टायटन्सचा संघ नियंत्रणात दिसत होता. पाटणानंही सावध खेळ करत टायटन्सला अधिक आघाडी घेण्याची संधी दिली नाही.मात्र, 17व्या मिनिटाला मोनू गोयतनं एकाच रेडमध्ये पाटणाच्या संघाला ऑलआऊट केलं आणि संघाला आठ गुणांची आघाडी मिळवून दिली. मोनू गोयनं पहिल्या हाफमध्ये दमदार प्रदर्शन करत 10 रेड पॉईंट मिळवले.सिद्धार्थ देसाईही पहिल्यांदाच रंगात दिसला आणि त्यानंही पहिल्या हाफमध्ये सहा रेड पॉइंट मिळवले. पाटणासाठी सचिन तन्वर आणि रोहित गुलिया यांना प्रत्येकी चार-चार रेड पॉइंट मिळवता आले.
ट्वीट-
Titan sunke ⌚ samjhe kya?
— ProKabaddi (@ProKabaddi) October 11, 2022
🔥 hai 𝗧𝗲𝗹𝘂𝗴𝘂 𝗧𝗶𝘁𝗮𝗻𝘀#vivoProKabaddi #FantasticPanga #PATvTT pic.twitter.com/YW90i157kp
मोनू गोयत, सिद्धार्थ देसाईची चमकदार खेळी
दुसऱ्या हाफमध्ये तेलुगू टायटन्सनं र्थ रेडवर खेळण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या हाफमधील 12व्या मिनिटाला दोन्ही संघाला फक्त नऊ गुण मिळवता आले.टायटन्सनं दुसऱ्या हाफमध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि फक्त आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, सतत प्रयत्न करूनही पाटणा टायटन्सच्या अधिक पॉईंट मिळवता आले नाहीत. या सामन्यात तेलुगू टायटन्सच्या मोनू गोयतनं नऊ रेड आणि एक टॅकल पॉईंट मिळवला. पहिल्या हाफमध्ये सिद्धार्थ देसाईनं सहा पॉईंट प्राप्त केले, परंतु दुसऱ्या हाफमध्ये त्या फक्त एकच पॉईंट मिळवता आला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)