(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PKL 2022: प्रो कबड्डीतील लो-स्कोरिंग थ्रिलर मॅच, तामिळ थलायवासला नमवून हरियाणा स्टीलर्सचा सलग दुसरा विजय
Pro Kabaddi League 2022: प्रो कब्बड्डी लीगच्या नवव्या हंगामातील हरियाणा स्टीलर्सचा हा सलग दुसरा विजय आहे.
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील 12 व्या सामन्यात हरियाणा स्टीलर्स आणि तामिळ थलायवास (Haryana Steelers vs Tamil Thalaivas) आमने-सामने आले. या लो-स्कोरिंग थ्रिलर सामन्यात हरियाणा स्टीलर्सनं तामिळ थलायवासचा 27-22 असा पराभव केला. या हंगामातील हरियाणा स्टीलर्सचा हा सलग दुसरा विजय आहे. तर, तामिळ थलायवासचा या हंगामातील पहिला पराभव आहे. तामिळ थलायवासचा पहिला सामना बरोबरीत सुटला होता. पवन सेहरावत दुखापतीतून सावरला नसल्यानं तो या सामन्यातही उपलब्ध नव्हता. तामिळ थलायवासच्या संघाला पवनची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे.
ट्वीट-
The #DhaakadBoys make it 2️⃣ in 2️⃣ 🔥#vivoProKabaddi #FantasticPanga #HSvCHE pic.twitter.com/yhgcKem6me
— ProKabaddi (@ProKabaddi) October 11, 2022
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाची संथ खेळी
हरियाणा स्टीलर्स आणि तामिळ थलायवास यांच्यातील सामन्याची सुरुवात अतिशय संथ झाली. पहिल्या 10 मिनिटांत कोणत्याही संघाला 10 पेक्षा अधिक गुण मिळवता आले नाहीत. दोन्ही संघातील रेडर्स सतत संघर्ष करताना दिसले.पहिला हाफ संपण्याआधी हरिणायाच्या मनजीतनं एकाच रेडमध्ये दोन गुण प्राप्त करुन तामिळ थलायवासला ऑलआऊटच्या जवळ ढकललं. त्यानंतर 19 व्या मिनिटात तामिळ थलायवास ऑलआऊट करून हरियाणा स्टीलर्सनं 14-8 अशी आघाडी घेतली.अखेरच्या मिनिटाला दोन गुण घेत थलायवासनं हाफपर्यंत हरयाणाची आघाडी पाच गुणांवर नेली होती.पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा-सहा टॅकल पॉइंट घेतले.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघाच्या डिफेंडर्सचं दमदार प्रदर्शन
या सामन्यातील दुसऱ्या हाफमध्ये डिफेंडर्सचं वर्चस्व पाहायला मिळालं. दोन्ही बाजूंच्या डिफेंडर्सनं आक्रमक खेळी करत सातत्यानं गुण मिळवले.हरियाणाचा जयदीप आणि थलायवासचा सागर राठी आपल्या संघासाठी सतत गुण जमा करत होते. पाच किंवा त्याहून अधिक रेड पॉइंट मिळवणारा मंजीत हा एकमेव रेडर आहे.थलायवासचे सर्व रेडर्स मिळून केवळ सात रेड प्वाइंट घेऊ शकले. हरियाणाच्या जयदीपनं आणि थलायवासच्या सागरनं हाय फाईव्ह लगावलं.
हे देखील वाचा-