एक्स्प्लोर
पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा, केदार जाधवला रोहित शर्माचा खोचक सल्ला
टिम इंडियाचा शिलेदार केदार जाधवने मोठ्या हौसेने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो अपलोड केला. या फोटोवर रोहित शर्माने गंमतीशीर कमेंट केली आहे.
मुंबई : भारताच्या वन डे संघाचा शिलेदार केदार जाधवने मोठ्या हौसेने इन्स्टाग्रामवर त्याचा फोटो अपलोड केला. या फोटोला रोहित शर्माने गंमतीशीर प्रतिसाद दिला आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर फलंदाजीचा सराव सुरु करण्याआधी काढून घेतलेला फोटो केदारने इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. पुन्हा एकदा मैदानात उतरताना आणि सर्वात आवडीची गोष्ट करताना छान वाटतंय, असं कॅप्शनही त्याने फोटोखाली लिहिले होती.
केदारच्या फोटोवर भारताचा सलामीवरी रोहित शर्माने मजेशीर कमेंट केली आहे. केदारला उद्देशून लिहिलेल्या कमेंटमध्ये रोहित म्हणतो की, पोज कम मार, बॅटिंग कर ले थोडा! रोहितनं गमतीने केलेली ती टिपण्णी जनमानसांत चांगलीच खसखस पिकवणारी ठरली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यासाठी केदार जाधवची संघात निवड झाली आहे. या मालिकेसाठी केदार सज्ज झाला आहे. गेल्या काही मालिकांमध्ये केदारला फलंदाजीत हवीतशी कामगिरी करता आलेली नाही. याचसोबत गोलंदाजीतही त्याची जादू ओसरलेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे केदार सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये अधिक सराव करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची वन-डे सामन्यांची मालिका ही केदारसाठी फॉर्ममध्ये परतण्यासाठी महत्वाची संधी असणार आहे.
रोहितची कमेंटView this post on InstagramFeels good to be back on the field and do what I like to do. 🏏🙂 #ranjitrophy @sareen_sports
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement