एक्स्प्लोर
फेसबुकवर पत्नीसोबतचा फोटो शेअर केल्यानं इरफान ट्रोल
क्रिकेटर इरफान पठाणनं रविवारी आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर अपलोड केला. या फोटोसोबत इरफाननं 'यह लड़की बडी मुसीबत है??#love #wifey' असं कॅप्शनही टाकलं होतं. पण याच फोटोवरुन त्याला सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ट्रोल करणं सुरु आहे.
मुंबई: क्रिकेटर इरफान पठाणनं रविवारी आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवर अपलोड केला. या फोटोसोबत इरफाननं 'यह लड़की बडी मुसीबत है??#love #wifey' असं कॅप्शनही टाकलं होतं. पण याच फोटोवरुन त्याला सोशल मीडियात कट्टर मुस्लिमांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करणं सुरु आहे.
इरफानची पत्नी सफा बेग ही या फोटोमध्ये आपल्या चेहऱ्या हातानं झाकत असल्याचं दिसत आहे. यावरुनच अनेकांनी ट्रोल करणं सुरु केलं. सफाचा चेहरा दिसत असल्यानं इरफानवर अनेकांनी टिका केली आहे.
पण टिकाकारांची काळजी न करता इरफाननं ट्वीटरवरही 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना लेकिन हमेशा प्यार कीजिए और घूमते रहिए' या कॅप्शनसह हा फोटो शेअर केला आहे.
अनेकांनी आपल्या कमेंटमध्ये हा फोटो काढून टाकण्याचा फुकटचा सल्ला इरफानला दिला आहे. तुम्ही मुस्लिम असल्यानं कसं वागायला हवं याचे धडेही त्याला सोशल मीडियावर दिले जात आहेत.
पण याचवेळी काही यूजर्स हे इरफानची पाठराखण करतानाही दिसून आले. जे इरफानला इस्लामचे धडे देत आहेत त्यांनी सर्वात आधी आपलं घर सांभाळावं असंही त्यांनी सुनावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement