एक्स्प्लोर
मुंबई इंडियन्सला झटका, स्टार गोलंदाज संघातून बाहेर
मुंबई इंडियन्सने पॅट कमिन्सला 5 कोटी 40 लाख रुपयांना या मोसमासाठी खरेदी केले होते. मात्र कंबरेच्या त्रासामुळे पहिल्याच सामन्यात म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यातही कमिन्स खेळू शकला नव्हता.
मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सला दोनच दिवसात दुसरा झटका बसला आहे. टीममधील अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज पॅट कमिन्सला दुखापतीमुळे बाहेर जावं लागलं आहे. पॅट कमिन्सच्या कंबरेला दुखापत झाली असून, त्याला पूर्ण टूर्नामेंट बाहेर बसावं लागणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मुंबई इंडियन्सने पॅट कमिन्सला 5 कोटी 40 लाख रुपयांना या मोसमासाठी खरेदी केले होते. मात्र कंबरेच्या त्रासामुळे पहिल्याच सामन्यात म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यातही कमिन्स खेळू शकला नव्हता. आता तर त्याला संघाबाहेरच जावे लागले आहे.
पॅट कमिन्स फ्रॅक्चर झाला नसला, तरी कंबरेला सूज चढली आहे. त्यामुळे कमिन्सकडे विश्रांतीशिवाय पर्यायही नव्हता.
दक्षिण आफ्रिकेविरोधील चौथ्या कसोटी दरम्यान गोलंदाजी करताना कमिन्सच्या कंबरेला त्रास होऊ लागला होता. तेव्हा सूज चढल्याचेही दिसले होते, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे फिजीओ डेव्हिड बॅकली यांनी दिली.
आयपीएलपर्यंत पॅट कमिन्स बरा होईल, अशी आशा होती. मात्र पहिल्या सामान्यादरम्यानही त्याला बरे वाटत नव्हते, त्यामुळे तो पहिला सामनाही खेळू शकला नाही. कमिन्सच्या कंबरेची दुखापत आणखी वाढू नये, याची खबरदारी म्हणून त्याला आयपीएलमधून परत बोलावल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.
पॅट कमिन्स आजच्या घडील ऑस्ट्रेलियन टीममधील स्टार बॉलर म्हणून ओळखला जातो. त्यांचा फॉर्म उत्तम सुरु आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील त्याची कामगिरीही चांगली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement