(Source: Poll of Polls)
Pat Cummins : पॅट कमिन्स फक्त 24 तासात जसं बोलला तसंच खरं करून गेला अन् टीम इंडियाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली
Pat Cummins : ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने आज कॅप्टनसी केली आणि जे काही बोलून गेला होता ते पाहता टीम इंडियाला त्याने 24 तासांपूर्वीच इशारा दिला होता का? अशी चर्चा आता रंगली आहे.
Pat Cummins : पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात डावखुरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची शानदार खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. याशिवाय लॅबुशेनने 58 धावा केल्या.
Pat Cummins said, "there was a sea of blue in the hotel and Stadium. To see 1,30,000 Indian shirts is an experience we'll never forget. The good thing was they weren't too noisy". pic.twitter.com/jVX4xnKMAr
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
पॅट कमिन्स फक्त 24 तासात जसं बोलला तसंच खरं करून गेला
ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने आज कॅप्टनसी केली आणि जे काही बोलून गेला होता ते पाहता टीम इंडियाला त्याने 24 तासांपूर्वीच इशारा दिला होता का? अशी चर्चा आता रंगली आहे. अंतिम सामन्यापूर्वी बोलताना तो म्हणाला होता की, भारत एक चांगला संघ असून आम्हाला मोहम्मद शमी हा एक मोठा धोका आहे. दीड लाख क्षमतेच्या स्टेडियममधील गर्दीच्या दबावाबद्दल बोलताना, कमिन्स म्हणाला की खेळामध्ये घरच्या संघाला पाठिंबा मिळणे काही नवीन नाही. पण विरोधी संघ म्हणून तुमच्या खेळाने स्टेडियममध्ये शांतता निर्माण करण्यापेक्षा आनंददायी आणि समाधानकारक काहीही असू शकत नाही. हेच आमचे ध्येय असणार आहे.
Pat Cummins#INDvAUS #ODIWorldCup2023 #ICCWorldCup2023 #INDvsAUS #WorldcupFinal pic.twitter.com/GMLgLuNlmB
— RVCJ Media (@RVCJ_FB) November 18, 2023
काही महान संघांना 1999, 2003, 2007 विश्वचषक चॅम्पियन बनताना पाहिलं असंही पॅट कमिन्स म्हणाला होता. मात्र, स्वत: आता कॅप्टन म्हणून पॅट कमिन्स त्याच पंगतीत गेला आहे. आजच्या सामन्यातील पॅट कमिन्सची रणनीती तंतोतंत खरी ठरली. त्याने जो शब्द बोलला तो खरा करून दाखवला आहे.
Pat Cummins on 15th November 2022 decided to skip the IPL for Ashes and World Cup.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 19, 2023
Pat Cummins on 19th November 2023 - Won the World Cup after drawing the Ashes. pic.twitter.com/JRX8wQ96tT
दुसरीकडे, जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद ठरले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 50 षटकांत 240 धावांवर सर्वबाद झाला. 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत सामना जिंकला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि मार्सन लॅबुशेन यांची चौथ्या विकेटसाठीची भागीदारी भारतीय गोलंदाजांसाठी पहिली ठरली, जी त्यांना समजू शकली नाही. दोघांनी 215 चेंडूत 192 धावा जोडल्या. मात्र, ही भागीदारी 43व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तुटली, जेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 2 धावांची गरज होती. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 137 धावा केल्या. तर लॅबुशेनने 110 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या