एक्स्प्लोर
पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारताचा जावई बनणार!
पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारताचा जावई बनणार आहे. याआधी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी 2010 मध्ये विवाह केला होता.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज हसन अली लवकरच बोहल्यावर चढणार आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे हसन अली ज्या मुलीसोबत निकाह करणार आहे, ती भारतीय आहे. हरियाणाच्या नूहं जिल्ह्यात राहणाऱ्या शामिया आरजूसोबत हसल अली लग्न करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू भारताचा जावई बनणार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. याआधी भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी 2010 मध्ये विवाह केला होता.
शामिया आरजू फ्लाईट इंजिनीअर असून ती सध्या एअर अमिरातमध्ये नोकरी करत आहे. येत्या 20 ऑगस्टला दुबईत त्यांचा विवाह पार पडेल. तर कुटुंबातील दहा सदस्य 17 तारखेला लग्नासाठी दुबईला रवाना होतील.
शामियाचे वडील लियाकत अली यांनी सांगितलं की, "शामियाने बीटेक (अॅरानॉटिकल) पदवी मिळवली आहे. तिने पहिली नोकरी जेट एअरवेजमध्ये केली होती. मागील तीन वर्षांपासून ती एअर अमिरातमध्ये फ्लाईट इंजिनीअर पदावर कार्यरत आहे."
पाकिस्तानचे माजी खासदा तुफैल आणि माझे आजोबा सख्खे भाऊ : लियाकत अली
"भारत-पाकिस्तान फाळणीवेळी पाकिस्तानचे माजी खासदार तसंच पाकिस्तान रेल्वे बोर्डाचे चेअरमन सरदार तुफैल उर्फ खान बहादुर आणि माझे आजोबा सख्खे भाऊ होते. त्यांचं कुटुंब सध्या पाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यातील कच्ची कोठी नईयाकीमध्ये राहतं. त्यांच्याकडून शामियांचं लग्न ठरलं आहे," असंही लियाकत अली यांनी सांगितलं.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हसनच्या भारताविरुद्ध तीन विकेट्स
पंजाब प्रांतात राहणारा हसन अलीने 9 कसोटी, 53 वनडे आणि 30 ट्वेण्टी-20 सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. त्याने कसोटीत 31, एकदिवसीय सामन्यात 82 आणि टी-20 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या आहेत. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हसनने भारताविरोधात 6.3 षटकात 3 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement