एक्स्प्लोर

कार्डीफच्या मैदानावर इंग्लंडपेक्षा पाकिस्तानचं पारडं जड!

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानच्या तुलनेत यजमान इंग्लंडचं पारडं जड मानलं जात आहे. याचं पहिलं कारण इंग्लंडचा संघ समतोल असून, त्यांनी साखळीत तिन्ही सामने जिंकले आहेत. इंग्लंडचं पारडं जड असण्याचं दुसरं कारण इंग्लंड मायदेशात खेळत आहे. 2015 सालच्या वन डे विश्वचषकात इंग्लंडवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली होती. पण गेल्या दोन वर्षांत इंग्लंडनं वन डे क्रिकेटमध्ये कात टाकली आहे. असं असलं तरी कार्डीफच्या मैदानावर मात्र पाकिस्तानचं पारडं जड आहे. कारण या मैदानावर झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर मात केली होती. आंतरराष्ट्रीय वन डेमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना इंग्लंडने 49, तर पाकिस्तानने 30 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर इंग्लंडमध्ये खेळताना इंग्लंड 26 आणि पाकिस्तानच्या नावावर 14 विजय आहेत. मात्र कार्डीफच्या मैदानात उभय संघांमध्ये झालेल्या एकमेव सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय विश्वचषकामध्ये उभय संघांनी एकमेकांविरुद्ध खेळताना प्रत्येकी चार विजय मिळवले आहेत. मात्र आता कार्डीफच्या मैदानावर होणाऱ्या या महत्वपूर्ण सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इंग्लंडची भक्कम बाजू इंग्लंडची सकारात्मक बाजू म्हणजे इंग्लंड मायदेशात खेळत आहे. 2015 सालच्या वन डे विश्वचषकात इंग्लंडवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली होती. पण गेल्या दोन वर्षांत इंग्लंडने वन डे क्रिकेटमध्ये कात टाकली आहे. इंग्लंडने मायदेशातल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा 4-1 असा धुव्वा उडवला. याच मालिकेतल्या ट्रेन्ट ब्रिजच्या वन डेत इंग्लंडनं तीन बाद 444 धावांचा नवा विश्वविक्रम रचला होता. बेन स्टोक्ससारखा जगाला हेवा वाटावा असा अष्टपैलू वीर आज इंग्लंडच्या ताफ्यात आहे. जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असा ज्यो रूटही इंग्लंडच्या संघात आहे. त्याशिवाय अॅलेक्स हेल्स, इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांच्याकडेही इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देण्याची ताकद आहे. जेक बॉल, लियाम प्लन्केट आणि मार्क वूड यांच्या समावेशानं इंग्लंडच्या हाताशी धारदार वेगवान आक्रमण आहे. धोकादायक पाकिस्तान इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ बेभरवशाचा असला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीतला सर्वात धोकादायक हा पाकिस्तानच आहे. कारण पाकिस्तानचं आक्रमण इतकं धारदार आहे की, प्रतिस्पर्धी संघावर कोणत्याही क्षणी बाजी उलटवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. मोहम्मद आमिर, जुनैद खान, हसन अली आणि फहिम अश्रफ असे चार चार वेगवान गोलंदाज पाकिस्तानच्या ताफ्यात आहेत. सलामीच्या सामन्यात टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर हा संघ चवताळून उठला आहे. पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांवर मिळवलेले विजय हा संघ किती ताकदीचा आहे, हेच दाखवणारे आहेत. इंग्लंडच्या तुलनेत पाकिस्तानची फलंदाज कमकुवत आहे. पण सलामीच्या फखर झमानच्या यशस्वी पदार्पणानं पाकिस्तानला नवा आत्मविश्वास मिळाला आहे. अझर अली, सरफराज अहमद, मोहम्मद हफिज आणि शोएब मलिक यांच्यावर पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार राहिल. ... तर पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात भिडणार आहेत. तर दुसरा सेमाफायनल भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर आणि दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशवर मात केली तर भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये लढत होऊ शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget