एक्स्प्लोर

पाकला 2019 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरणंही कठीण

दुबई : पाकिस्तानला 2019 च्या आंतरराष्ट्रीय विश्वचषकासाठी थेट पात्र होणं अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे. संघाची सततची खराब कामगिरी यामागचं कारण आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये पाकिस्तानची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. आयसीसीच्या आकडेवारीनुसार पाकिस्तान सध्या 89 गुणांसह दोन अंकांनी बांगलादेशच्या मागे आहे, तर दोन अंकांनी वेस्ट इंडिजच्या पुढे आहे. यजमान इंग्लंडशिवाय 30 सप्टेंबर 2017 पर्यंत आयसीसीच्या वन डे क्रमवारीतील टॉप 7 संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील. पाकिस्तान संघ विश्वचषकाला पात्र ठरण्यासाठी गुणांची कमाई करण्यास अपयशी ठरला आहे. शिवाय संघाच्या क्रमवारीतही काही खास बदल झालेले नाहीत, असं आयसीसीने म्हटलं आहे. पाकिस्तान फेब्रुवारीमध्ये संयुक्त अरब अमीरातमध्ये (यूएई) बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि एक टी-ट्वेंटी सामना खेळणार आहे. त्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तान वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन वन डे आणि दोन टी-ट्वेंटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना करायचा आहे. पाकिस्तानला नुकत्याच खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-4 असा दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे येत्या काळात बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवणं पाकिस्तानला गरजेचं असेल. टीम इंडिया सध्या 112 गुणांसह आयसीसीच्या वन डे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर ऑस्ट्रेलिया 120 गुणांसह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका 116 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd TEST Day-1 Day 1 Stumps : 117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
117 धावांचा पडिक्कल शो! गिलची फिफ्टी, पंतने अचानक मैदान सोडलं, पण टीम इंडिया दिवस अखेर 300 धावा पार
IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal : श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Embed widget