एक्स्प्लोर

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला 'हे' दिव्य पार करावं लागणार

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज (बुधवारी) झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने आज विश्वचषकातला सहावा विजय साजरा केला आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडवर मिळवलेल्या या विजयाने पाकिस्तानचं विश्वचषकातलं उरलंसुरलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे असं म्हणू शकतो.

लंडन : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज (बुधवारी) झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी धुव्वा उडवला आहे. इंग्लंडने आज विश्वचषकातला सहावा विजय साजरा केला आहे. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात नऊ सामन्यांअखेर 12 गुण झाले आहेत. इंग्लंडने बारा गुणांसह विश्वचषकाच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडनं न्यूझीलंडवर मिळवलेल्या या विजयाने पाकिस्तानचं विश्वचषकातलं उरलंसुरलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे असं म्हणू शकतो. कारण बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात एक मोठं दिव्य केलं तरच पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. हे दिव्य करणे खूपच अवघड आहे. आजचा सामना जिंकून इंग्लंडने 12 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे. तर न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट +0.175 आहे. तर पाकिस्तान 9 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. परंतु पाकिस्तानचा नेट रनरेट -0.792 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तानने बांग्लादेशविरुद्धचा सामना जिंकून 11 गुण कमावले तरी, नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा कमी असल्याने पाकिस्तान उपांत्य फेरीत प्रवेश करु शकणार नाही. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला बांग्लादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. प्रचंड धावांच्या फरकाने बांग्लादेशला हरवावं लागणार आहे. त्यासाठी पाकिस्तानला पहिली फलंदाजी करणे अनिवार्य आहे. म्हणूनच सामन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला टॉस जिंकावा लागेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने या सामन्यात 400 धावांची मजल मारली, तर बांगलादेशला 84 धावांत गुंडाळून त्यांना 316 धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. पाकिस्तानने जर या सामन्यात 350 धावांची मजल मारली, तर बांगलादेशला 38 धावांत गुंडाळून, त्यांना 312 धावांनी विजय मिळवणे आवश्यक आहे. तरच पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होईल. त्याच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेशदेखील मिळेल. जर पाकिस्तानला धावांचा पाठलाग करावा लागला, तर त्या विजयाचे अंतर नेट रनरेटसाठी उपयोगी ठरणार नाही. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता बांग्लादेशने दिलेले आव्हान पार केले तरी पाकिस्तानचा नेट रनरेट न्यूझीलंडपेक्षा चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे पाकिस्तानला त्यांचा गाशा गुंडाळावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget