Pakistan Cricket Team : स्पॉट फिक्सिंगमुळे 5 वर्षांची बंदी घातलेला 'फिक्सर' पाकिस्तान निवड समितीच्या अध्यक्षांना 'सल्ला' देणार!
39 वर्षीय सलमान बटवर 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. 2015 मध्ये संपलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात फिक्सिंग केल्याबद्दल बटवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) माजी कर्णधार सलमान बट्टला राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान दिले आहे. फिक्सिंग प्रकरणात सलमानला 5 वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागलं आहे. त्याची मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बट व्यतिरिक्त माजी यष्टीरक्षक कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांनाही मुख्य निवड समितीचे सल्लागार बनवण्यात आले आहे.
2010 मध्ये स्पॉट फिक्सिंगवर 5 वर्षांची बंदी
39 वर्षीय सलमान बटवर 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. 2015 मध्ये संपलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात फिक्सिंग केल्याबद्दल बटवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. बंदी संपल्यानंतर तो पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकला नाही. 2016 मध्ये त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो खूप यशस्वी ठरला पण त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आले नाही.
बट पाकिस्तानसाठी ३३ कसोटी खेळला
सलमान बट्टने पाकिस्तानसाठी 33 कसोटी सामन्यांमध्ये 30.47 च्या सरासरीने 1889 धावा केल्या आहेत. त्याने 78 एकदिवसीय सामन्यांमध्ये 36.33 च्या सरासरीने 2725 धावा केल्या आहेत. तर 24 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 28.33 च्या सरासरीने 595 धावा केल्या आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 7 आयपीएल सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला फक्त 193 धावा करता आल्या.
एकदिवसीय विश्वचषकानंतर बदल
एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत. विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाला 5 वे स्थान मिळवूनही उपांत्य फेरी गाठता आली नाही. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडले. कसोटी संघाचे कर्णधारपद आता शान मसूदकडे सोपवण्यात आले आहे. तर टी-२० इंटरनॅशनलची कमान शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपवण्यात आली होती.
तर मोहम्मद हाफीज यांची क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर उमर गुलची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि सईद अजमलची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.