एक्स्प्लोर

क्रिकेटमध्ये टिकण्यासाठी 'त्या' एका गोष्टीची नितांत आवश्यकता आहे : लसिथ मलिंगा

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने काल (26 जुलै) एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा सामना मलिंगाच्या कारकिर्दीतला अखेरचा एकदिवसीय सामना ठरला.

कोलंबो : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने काल (26 जुलै) एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बांगलादेशविरुद्धचा सामना मलिंगाच्या कारकिर्दीतला अखेरचा एकदिवसीय सामना ठरला. गोलंदाजीची राऊंड आर्म शैली आणि अचूक यॉर्करमुळे मलिंगाने क्रिकेटविश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. निवृत्तीबाबत बोलताना मलिंगा म्हणाला की, क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही मॅचविनर असणं आवश्यक आहे. माझा कर्णधार माझ्याकडून जास्तीत जास्त विकेट्स मिळवण्याची अपेक्षा करतो. माझ्या कर्णधाराची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, नवे युवा गोलंदाजदेखील चांगली कामगिरी करतील. नव्या गोलंदाजांनादेखील मॅच विनर व्हावं लागेल. टीममधील नव्या दमाचे गोलंदाज उत्तम खेळत आहेत. आपल्याला त्यांची चांगली देखभाल करावी लागेल. मलिंगा म्हणाला की, मी गेली 15 वर्षे देशासाठी खेळतोय. देशासाठी खेळणं मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. मला आता वाटतं की, मी पुढे जायला हवं. आम्हाला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी टीम बनवायची आहे. त्यामुळे मी थांबण्याची वेळ आली होती. आता मला जावं लागेल. दरम्यान मलिंगाने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आपण टी-20 क्रिकेट खेळत राहणार असल्याचे म्हटले आहे. टी-20 क्रिकेट वर्ल्डकपपर्यंत टी-20 सामने खेळणार आहे. वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळेल अशी आशा असल्याचे तो म्हणाला. तसेच श्रीलंकेला टी-20 वर्ल्डकप जिंकून देण्याचे माझे स्वप्न आहे, अशी प्रतिक्रियादेखील त्याने दिली. तसेच माझ्यापेक्षा उत्तम खेळाडू माझ्या जागी खेळला तर मला अधिक आनंद होईल अशी खिलाडीवृत्ती मलिंगाने आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये व्यक्त केली आहे. नुकत्याच इंग्लंडमध्ये वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचा संघ सेमी फायनल गाठू शकला नाही. वर्ल्डकप स्पर्धेत मलिंगाने 7 लढतीत 13 बळी घेतले. 2004 साली मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. मलिंगाने श्रीलंकेकडून 225 एक दिवसीय लढतीत 335 बळी मिळवले. मुरलीधरन (523 बळी) आणि चामिंडा वास (399 बळी) नंतर श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी मलिंगाच्या नावावर आहेत. तसेच 30 कसोटीत 101 बळी आणि 73 टी-30 लढतीत 97 बळींची नोंद मलिंगाच्या खात्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-1 : KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
KL राहुल रिटायर्ड हर्ट झाला, गिल लवकर गेला… पण पडिक्कल नडला! शतकाचा तडाखा देत श्रीलंकेची झोप उडवली, गॉलमध्ये पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?
Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget