Oman Squad For Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये पहिल्यांदाच ‘हा’ संघ भारत-पाकिस्तानसमोर, टीमची घोषणा, जाणून घ्या कोण आहेत 17 शिलेदार?
आशिया कप 2025 चा थरार 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचं आयोजन भारताकडे असलं तरी सामने न्यूट्रल वेन्यूवर, म्हणजेच यूएईमध्ये खेळवली जाणार आहे.

Oman Squad For Asia Cup 2025 : आशिया कप 2025 चा थरार 9 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचं आयोजन भारताकडे असलं तरी सामने न्यूट्रल वेन्यूवर, म्हणजेच यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी स्पर्धेत तब्बल 8 संघ उतरतील आणि विशेष म्हणजे, एक असा संघ पहिल्यांदाच आशिया कपमध्ये आपली ताकद आजमावणार आहे.
ओमानची पहिली एंट्री
आशिया कप 2025 मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, हाँगकाँग या पारंपरिक संघांसोबतच ओमानचा संघ पहिल्यांदाच खेळणार आहे. ओमानने 2024 मध्ये झालेल्या एसीसी प्रीमियर कपमध्ये उपविजेतेपद मिळवत आशिया कपसाठी पात्रता मिळवली होती.
🚨 Squad Announcement! 🇴🇲
— Oman Cricket (@TheOmanCricket) August 25, 2025
Here's Oman's Squad for our first-ever edition as a part of the Asia Cup 2025!! 🏏
We move in with a blend of experience and youth at the big stage with bigger dreams to achieve as a team! 💪🇴🇲
More to Follow..#OmanCricket #AsiaCup2025… pic.twitter.com/8XGqhNOVYQ
ओमान भारताच्या गटात
ओमान संघ 2025 च्या आशिया कपमध्ये भारतीय संघासोबत गट-अ मध्ये आहे. भारत, ओमान, पाकिस्तान आणि युएई संघ गट-अ मध्ये आहेत. ओमान संघ 12 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळेल. त्याच वेळी, पुढचा साखळी सामना 15 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध आणि तिसरा साखळी सामना 19 सप्टेंबर रोजी भारताबरोबर खेळला जाईल.
ओमान संघाची टी-20 मधील कामगिरी
ओमान क्रिकेट संघाने आतापर्यंत एकूण 98 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 44 जिंकले आहेत आणि 51 सामने गमावले. त्याच वेळी, 2 सामने बरोबरीत सुटले आणि एका सामन्याचा निकाल नाबाद राहिला. ओमान संघाने 2015 मध्ये पहिला टी-20 सामना खेळला.
संघाची धुरा जतिंदर सिंगकडे
आशिया कपसाठी ओमानने 17 जणांचा संघ जाहीर केला आहे. कर्णधारपदाची जबाबदारी जतिंदर सिंहकडे देण्यात आली आहे. संघात विनायक शुक्ला आणि सुफियान युसुफ हे दोन विकेटकीपरही समाविष्ट आहेत.
𝐎𝐦𝐚𝐧 𝐡𝐚𝐯𝐞 𝐚𝐧𝐧𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐝 𝐚 𝐧𝐞𝐰-𝐥𝐨𝐨𝐤 𝐬𝐪𝐮𝐚𝐝 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 #𝐀𝐂𝐂𝐌𝐞𝐧𝐬𝐀𝐬𝐢𝐚𝐂𝐮𝐩𝟐𝟎𝟐𝟓 🇴🇲#ACC pic.twitter.com/2YA46SSa2M
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 26, 2025
ओमान संघ (Oman Squad For Asia Cup 2025) : जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान महमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, झिकारिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
























