एक्स्प्लोर
Advertisement

तृप्ती देसाईंच्या लढ्याला यश, कोतूळच्या मोठेबाबा मंदिरात महिलांना प्रवेश

अकोले (अहमदनगर) : शनी शिंगणापूर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये आंदोलन केल्यानंतर आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अकोले तालुक्यातील कोतूळ गावात आंदोलन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेश बंदी असलेल्या कोतूळ गावातील मोठेबाबा मंदिरात प्रवेश करीत महिलांना आजपासून प्रवेश मिळवून दिला.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ गावातील मोठेबाबा मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना प्रवेशास बंदी होती. या मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तृप्ती देसाईंची भूमाता ब्रिगेड लढा देत होती.
तृप्ती देसाई यांनी आज कोतूळ गावात मोठेबाबा देवस्थानात प्रवेश करण्याचा निर्धार केला आणि तो मिळवला. यावेळी ग्रामस्थांनी आपली नकारात्मक भूमिका सोडत महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानं आंदोलक आणि ग्रामस्थांमधील वादावर पडदा पडला. तृप्ती देसाई यांनी भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह मंदिरात प्रवेश करत दर्शन घेतले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
