Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य
Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
![Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य Novak Djokovic wore a mysterious nanotechnology device during tennis match Taopatch ® SPORT device benefits Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/03/5a0badc1e64eb069a00562893127fc841685779939612322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mysterious Nanotechnology Device : तुम्ही हॉलिवूडच्या प्रसिद्ध 'आर्यन मॅन' (Iron Man) चित्रपट नक्कीच पाहिला असेल. यामध्ये दाखवलं आहे की, Iron Man च्या शरीरात एक मशीन बसवलेलं जे त्याच्या ह्रदयाचं काम करत. आता जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या (Novak Djokovic) छातीवरही असलेलं एक डिव्हाईस चर्चेचा विषय ठरला आहे. जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जोकोविचनं लावलंय Iron Man चं हार्ट?
पॅरिसमधील फ्रेंच ओपन 2023 स्पर्धेदरम्यानचे सर्बियन टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचचे फोटो व्हायरल होत आहेत. नोव्हाक जोकोविचच्या छातीवर एक लहान रहस्यमय वस्तू टेप केलेली दिसली.या फोटोंमध्ये त्याच्या छातीवर एक छोटं डिव्हाईस बसवलेलं असून टेप असल्याचं दिसत आहे. या फोटोंवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. काही युजर्स जोकोविचने आर्यन मॅनप्रमाणे हार्ट बसवल्याचं बोलत आहेत.
छातीवरचं छोटंसं डिव्हाईस आहे यशाचं रहस्य
फ्रेंच ओपन 2023 स्पर्धेमध्ये मार्टन फ्यूकोविक विरुद्धच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यानच्या फोटोंमध्ये नोव्हाक जोकोविचचा टी-शर्ट काढलेला फोटो व्हायरल होत आहे. या हा फोटो जोकोविचच्या बॉडीमुळे नाही तर, त्यामध्ये त्याच्या छातीवर टेप लावलेल्या छोट्या डिव्हाईसमुळे चर्चेत आला आहे.
जोकोविच्या छातीवर बसवलेलं हे डिव्हाईस खेळाडूंच्या कामगिरीला चालना देण्यासाठी वापरलं जाणारे नॅनोटेक्नॉलॉजी उपकरण असल्याचं उघड झालं आहे. जोकोविचने हे डिव्हाईस त्याच्या कारकिर्दीचं सर्वात मोठे रहस्य असल्याचा दावाही केला आहे.
"My team delivered some incredibly efficient nanotechnology to help me deliver my best on the court. So, that's the biggest secret of my career. If it wasn't for that, I probably wouldn't be sitting here". Heartfelt thanks
— Taopatch.com (@Taopatch) June 1, 2023
for showing the world Taopatch® SPORT! We are honored… pic.twitter.com/ApwlU3Ndx7
उपकरणाबाबत काय म्हणाला नोव्हाक जोकोविच?
छातीवरील चिपबद्दल विचारल्यावर जोकोविचने मिश्लिकपणे सांगितलं की. “जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला आर्यन मॅन खूप आवडायचा, म्हणून मी आयर्न मॅनची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.” त्याने पुढे सांगितलं की, “माझी टीम मला टेनिस कोर्टवर माझी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मला या डिव्हाईसद्वारे कार्यक्षम नॅनोटेक्नॉलॉजी पुरवतात. हे माझ्या कारकिर्दीचं सर्वात मोठं रहस्य आहे. हे डिव्हाईस नसतं तर कदाचित मी इथे बसलो नसतो.”
Djokovic uses Taopatch® SPORT nanotechnology!
— Taopatch.com (@Taopatch) June 1, 2023
Taopatch® SPORT nourishes the body with wavelengths of therapeutic light, without side effects or the release of any chemicals. Wearable every day, it's activated by sunlight and body heat ensuring treatments of 720 hours each month.… pic.twitter.com/1nTzPnj8FX
'या' कंपनीनं बनवलं आहे डिव्हाईस
Tao Technologies नावाची एक इटालियन कंपनीने हे डिव्हाईस बनवल्याचा दावा केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कंपनीकडे मानवी आरोग्य आणि कल्याणासाठी नाविन्यपूर्ण नॅनोटेक्नॉलॉजिकल उपकरणांचे पेटंट आहे. जोकोविचच्या छातीवर असलेल्या डिव्हाइसचे फोटो ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर या कंपनीने या डिव्हाइसबद्दल अधिक माहिती उघड केली आहे.
Taopatch® SPORT नॅनोटेक्नॉलॉजी डिव्हाईस
टाओ टेक्नॉलॉजी कंपनीने याबाबत ट्विट करत लिहिलं आहे की, आजतागायतच्या सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक, नोव्हाक जोकोविचने शुक्रवारी रात्री रोलँड गॅरोस येथे मार्टन फुक्सोविक्स विरुद्धच्या सामन्यादरम्यानचा फोटो पाहिला. यामध्ये त्याच्या छातीवर असणारं चिप त्याच्या कारकिर्दीचं रहस्य असल्याचं जोकोविचने घोषित केलं. जोकोविचच्या छातीवरील हे नॅनोटेक्नॉलॉजी डिव्हाईस Taopatch® SPORT आहे."
या उपकरणाचा फायदा काय?
Taopatch पेटंट केलेले नॅनोटेक्नॉलॉजी डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस तुमच्या शरीरातील उष्णतेचे प्रकाशात रूपांतर करून ते तुमच्या मज्जासंस्थेमध्ये पाठवते. कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार हे उपकरण शरीराची ठेवण, संतुलन आणि लवचिकता सुधारण्यासाठी, ऍथलेटिक कामगिरी आणि एकाग्रता वाढविण्यासाठी काम करते. तसेच यामुळे तणाव, चिंता आणि तीव्र वेदना कमी करण्यासही मदत करते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)