एक्स्प्लोर
Wimbledon 2018 : राफेल नदालला हरवत जोकोविच अंतिम फेरीत
जोकोविचनं द्वितीय मानांकित राफेल नदालचा संघर्ष 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 असा पाच सेट्समध्ये मोडून काढला.

लंडन : सर्बियाच्या बाराव्या मानांकित नोवाक जोकोविचनं कारकीर्दीत पाचव्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आता विम्बल्डनच्या फायनलमध्ये जोकोविचला दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनशी मुकाबला करावा लागणार आहे. हा सामना आज (रविवारी) संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे.
सेमी फायनलमधील जोकोविच आणि नदाल यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार झाला. या दोघांनी सामन्यात टेनिसरसिकांना तब्बल सव्वा पाच तास खिळवून ठेवलं. जोकोविचनं द्वितीय मानांकित राफेल नदालचा संघर्ष 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 असा पाच सेट्समध्ये मोडून काढला.
2011, 2014 आणि 2015 चा विजेता जोकोविचला दक्षिण आफ्रिकेतील केव्हिन अँडरसन सामना करणार आहे. दक्षिण आफ्रिकाच टेनिसपटू 97 वर्षांनंतर विंम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
जर आज जोकोविचने विम्बल्डनची फायनल जिंकली तर त्याच तेरावं ग्रँड स्लॅम विजेतेपद असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
