एक्स्प्लोर
Advertisement
US Open 2018 : ज्योकोविच अंतिम फेरीत, जपानच्या निशीकोरीवर मात
अमेरिकन ओपनमधल्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोवाक ज्योकोविचचा सामना अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोशी होईल.
मुंबई : अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात नोव्हाक ज्योकोविचन जपानच्या केई निशीकोरीचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. सामन्यात ज्योकोविचने निशिकोरीचा 6-3, 6-4, 6-2 असा धुव्वा उडवला.
सामन्यात ज्योकोविचसमोर निशीकोरी दबावाखाली खेळताना दिसला. अनुभवी ज्योकोविचसमोर निशीकोरीला टिकाव लावता आला नाही. अखेरीस ज्योकोविचन सान्यावर आपली पकड मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
अमेरिकन ओपनमधल्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोवाक ज्योकोविचचा सामना अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोशी होईल.
दरम्यान गतविजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या राफेल नदालनं गुडघ्याच्या दुखापतीमुळं डेल पोत्रोशीविरुद्धच्या उपांत्य सामन्यातून माघार घेतली. त्यामुळेच डेल पोत्रोशीला अंतिम फेरी गाठता आली. यापूर्वी सामन्यात डेल पोट्रो 7-6, 6-2 असा आघाडीवर होता.
ज्योकोविच-डेल पोत्रोशी यांची आत्तापर्यंतची कामगिरी
ज्योकोविचने आजवरच्या कारकीर्दीत 2011 आणि 2015 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं आहे, तर डेल पोत्रोशीने 2009 साली अमेरिकन ओपन जिंकण्याची कामगिरी बजावली होती.
गेल्या दहा वर्षांत ज्योकोविच आणि डेल पोत्रोशी एका ग्रँड स्लॅम फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण त्या दोघांमध्ये झालेल्या अठरा सामन्यांमध्ये ज्योकोविचनं १४-४ असं वर्चस्व राखलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
मुंबई
Advertisement