आयुष्यात खरा आनंद परत मिळाला, ISL च्या यशस्वी आयोजनाने नीता अंबानी खुश
आईएसएलच्या सातव्या सीझनची सुरुवात 20 नोव्हेंबर 2020 ला करण्यात आली होती. या टूर्नामेंटमध्ये 11 क्लब सहभागी झाले होते.
![आयुष्यात खरा आनंद परत मिळाला, ISL च्या यशस्वी आयोजनाने नीता अंबानी खुश Nita Ambani Delighted With Success Of ISL 2020-21 in Coronavirus आयुष्यात खरा आनंद परत मिळाला, ISL च्या यशस्वी आयोजनाने नीता अंबानी खुश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/2/2020/11/01210050/jio-nita-ambani.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
इंडियन सुपर लीगच्या सातव्या सीझनचे गोव्यात आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी गोव्यात फातोर्दा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये मुंबई सिटी एफसीने एटीके मोहन बागान या संघाला पराभूत करुन विजेते पदावर आपले नाव कोरले. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हल्पमेंट लिमिटेडच्या अध्यक्ष निता अंबानी यांनी आईएसएलच्या सातव्या सीझनच्या यशस्वी आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. नीता अंबानी म्हणाल्या, आईएसएलचा सातवा सीझन लोकांच्या आयुष्यात आनंद परत घेऊन आला आहे.
नीता अंबानी यांनी या संदर्भात एक व्हिडीओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. नीता अंबानी म्हणाल्या, आईएसएलाचा हा सीझन इतर सीझनपेक्षा वेगळा आहे. जग कोरोना महामारीशी लढताना देखील आम्ही यशस्वीरीत्या आईएसएलचे आयोजन केले. भारतात कोणत्याही अडथळ्याशिवाय यशस्वी टूर्नामेंटचे आयोजन केल्याचा आम्हाला अभिमान आहे.
115 मॅचचे आयोजन
नीता अंबानी म्हणाल्या, चार महिने आम्ही लोकांच्या आयुष्यात आनंद परत आणण्याचा प्रयत्न केला. अनेक आव्हाने पार करत आम्ही फुटबॉल सीझनचे आयोजन केले. या सीझनमध्ये एकूण 115 मॅच खेळवण्यात आल्या.
आईएसएलच्या सातव्या सीझनची सुरुवात 20 नोव्हेंबर 2020 ला करण्यात आली होती. या टूर्नामेंटमध्ये 11 क्लब सहभागी झाले होते. आईएसएलच्या संपूर्ण सीझनमध्ये सुरक्षित बबलमध्ये प्रेक्षकांविना खेळवण्यात आला. तसेच नीता अंबानी यांनी मुंबई सिटी एफसीला शुभेच्छा देखील दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)