South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले; क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे पहिलं विश्व विजेतेपद
South Africa Women vs New Zealand Women : प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 126 धावा करता आल्या.
South Africa Women vs New Zealand Women : न्यूझीलंडने प्रथमच महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज (20 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात संघाने दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 5 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 126 धावा करता आल्या.
THE HISTORIC MOMENT FOR NEW ZEALAND...!!! 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2024
- First ever T20 World Cup in New Zealand cricket history. 🙇♂️🔥pic.twitter.com/N4ih4JgBiP
न्यूझीलंडकडून अमेलिया केरने 43, ब्रुक हॅलिडेने 38 आणि सुझी बेट्सने 32 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको मलाबाने सर्वाधिक 2 बळी घेतले. क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क आणि अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. किवी संघ तब्बल 14 वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला होता. याआधी हा संघ 2009 आणि 2010 या दोन्ही विश्वचषकांच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका सलग दुसऱ्यांदा फायनल खेळणार आहे, 2023 मध्ये त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
24 Year Old Amelia Kerr in the T20 World Cup Final:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2024
- 43 (38) & 3/24.
- A clutch performance by Kerr, a historic win! pic.twitter.com/ZcImN0o5au
न्यूझीलंडने महिला टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. किवी संघ पहिल्यांदाच हा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील न्यूझीलंडचे हे पहिले विश्वचषक विजेतेपद आहे. देशाच्या पुरुष संघाला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजी निवडली. न्यूझीलंडने 158 धावा केल्या.
- Lost in the 2023 T20 WC final.
— Johns. (@CricCrazyJohns) October 20, 2024
- Lost in the 2024 T20 WC final.
- Lost in the 2024 T20 WC final.
3 HEART BREAK FOR SOUTH AFRICA 💔 pic.twitter.com/P7UYKIkOqK
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सातत्याने विकेट गमावल्या आणि अखेरीस संघ केवळ 126 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेला महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. या वर्षी जूनमध्ये झालेल्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या