एक्स्प्लोर
गौरिका सिंग रिओ ऑलिम्पिकमधील सर्वात तरुण स्पर्धक

नवी दिल्ली : नेपाळची जलतरणपटू गौरिका सिंग ही रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सर्वात तरुण खेळाडू ठरणार आहे. गौरिका सिंग ही केवळ 13 वर्षांची असून ऑलिम्पिकमध्ये ती महिलांच्या 100 मीटर्स बॅकस्ट्रोक हिट्स प्रकारात सहभागी होणार आहे.
गौरिका सिंगनं फेब्रुवारी महिन्यात भारतात झालेल्या दक्षिण आशियाई खेळांमध्ये तीन कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली होती. तर रशियाच्या कझानमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही गौरिका सिंग सहभागी झाली होती.
जलतरणात गौरिकाच्या नावावर सात राष्ट्रीय विक्रम जमा आहेत. आता रिओ ऑलिम्पिकमध्येही 100 मीटर्स बॅकस्ट्रोक प्रकारातला 1 मिनिटं आणि 7.31 सेकंदांचा आपला राष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी गौरिका सज्ज झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
