एक्स्प्लोर

विराटचं तुफानी द्विशतक, भारताकडे 405 धावांची आघाडी

विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 19वं शतक ठरलं.

नागपूर : कर्णधार विराट कोहलीच्या दमदार द्विशतकामुळे टीम इंडियाला नागपूर कसोटी जिंकण्याची नामी संधी आहे. कारण, सध्या टीम इंडियाच्या हाताशी पहिल्या डावात 405 धावांची भक्कम आघाडी आहे. तर टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मानं नागपूर कसोटीत श्रीलंकेला खातं उघडण्याआधीच पहिला धक्का दिला. ईशांतनं सदिरा समरविक्रमाचा शून्यावरच त्रिफळा उडवला. त्यानंतर दिमुथ करुणारत्ने आणि लाहिरू थिरीमनेनं श्रीलंकेला तिसऱ्या दिवसअखेर एक बाद 21 धावांची मजल मारून दिली. नागूपर कसोटीत भारतानं आपला पहिला डाव सहा बाद 610 धावांवर घोषित केला. त्यामुळं टीम इंडियाच्या हाताशी पहिल्या डावात 405 धावांची आघाडी आहे. या कसोटीत अजूनही दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळं टीम इंडियाला ही कसोटी जिंकण्याची नामी संधी आहे. विराट कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं दमदार पाचवं द्विशतक विराट कोहलीने कारकीर्दीतलं पाचवं द्विशतक झळकावून, नागपूर कसोटीवर टीम इंडियाची पकड आणखी घट्ट केली. विराटचं हे यंदाच्या मोसमातलं दुसरं कसोटी द्विशतक ठरलं. त्याने 259 चेंडूंत 15 चौकार आणि दोन षटकारांसह या द्विशतकाला गवसणी घातली. 213 धावांवर तो बाद झाला. विराटने रोहित शर्माच्या साथीने पाचव्या विकेटसाठी दीडशेहून अधिक धावांची अभेद्य भागीदारी रचली. रोहित शर्माही कसोटी शतकाच्या दिशेने कूच करत आहे. या कसोटीत टीम इंडियाने चहापानानंतर चार बाद 570 धावांची मजल मारली. त्यामुळे भारताच्या हाताशी साडे तीनशेहून अधिक धावांची आघाडी झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने मोठी मजल मारली. उपहारापर्यंत चेतेश्वर पुजारा 143 आणि विराट कोहली 124 धावांवर खेळत होते. कसोटीत सर्वाधिक वेगाने 19 शतकं कसोटीत विराटने 19 शतकं पूर्ण केले. एवढ्या वेगाने 19 कसोटी शतकांपर्यंत पोहोचणारा विराट पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याने 104 इनिंगमध्ये 19 शतकं पूर्ण केले. विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. सचिनने 105 कसोटींमध्ये 19 शतकं पूर्ण केले होते. कसोटीत सर्वाधिक वेगाने 19 शतकांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. विराटचं कर्णधार म्हणून बारावं शतक, सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे. नागपूर कसोटीत मुरली विजय, चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही दमदार शतक झळकावलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 19वं शतक ठरलं. 10 चौकारांसह विराटने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतील सलग दुसरं शतक साजरं केलं. कर्णधार या नात्याने विराटचं हे बारावं कसोटी शतक ठरलं. त्यामुळे या शतकासोबतच विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सुनिल गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला. गावसकर यांनी कर्णधार असताना कसोटीत 11 शतकं ठोकली होती. दरम्यान कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशी भारताने 2 बाद 373 धावांची मजल मारली आहे. सोबतच या कसोटीवर भारताने आपली पकड आणखी मजबूत केली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हाच सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांनी टीम इंडियाने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली होती. टीम इंडियाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावांची मजल मारत श्रीलंकेवर 107 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतक साजरं केलं. त्याने 221 चेंडूंत 128 धावांची खेळी केली. यात त्याने 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुजारानही 284 चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद 121 धावांची खेळी उभारली. पुजाराचं कारकीर्दीतलं हे 14 वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI : वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या चुकांचा पाढा वाचला
वेस्ट इंडिजचा दुसऱ्या टी 20 मध्ये भारतावर विजय, सुनील गावस्कर यांनी मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला, काय चुकले ते स्पष्ट केलं
IND vs WI 3rd ODI Playing XI : दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
दोन बडे खेळाडू OUT, तर... एका पराभवानंतर उलथापालथीचे संकेत, तिसऱ्या टी-20साठी अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI?
IND vs WI 2nd T20 : गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
गोलंदाजांचं करिअर उद्ध्वस्त... रांचीतील पराभवानंतर गौतम गंभीरचा पारा चढला, नेमका राग कुणावर?
AB De Villiers : जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं
जलवा है हमारा! एबी डिव्हिलियर्स नावाचं वादळ; अवघ्या 37 चेंडूंत ठोकले सनसनाटी शतक, ऑस्ट्रेलियन संघाला पाणी पाजलं

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
'भारत अघोषित आणीबाणीत, अटकेतील आंदोलकांची उद्यापर्यंत सुटका झाली नाही, तर..' सोनम वांगचूक यांचा गर्भित इशारा, दिल्लीतील रस्त्यावरची उचलाउचली पाहून निर्णय अवघ्या काही तासात बदलला
Embed widget