एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

उद्धव ठाकरेंनी 18 जुलै रोजी रामरक्षा आंदोलन करण्यासाठी नागपूर निवडलं, रामरक्षा आंदोलन मुंबईत सुरू केलं आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात पोहोचलं आहे.

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर चोरीप्रकरणी ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. शिवसेना पक्षातील आमदारांनाही मतदारसंघात या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेण्याचं सांगण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंनी स्वत: दादर येथील राम मंदिरात जाऊन रामरक्षा आंदोलन केले होते. आता, 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हिंदूंना जागं करण्यासाठी रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपूर (Nagpur) येथील राम मंदिरात जाऊन पाहणी केली. यावेळी,   

उद्धव ठाकरेंनी 18 जुलै रोजी रामरक्षा आंदोलन करण्यासाठी नागपूर निवडलं, रामरक्षा आंदोलन मुंबईत सुरू केलं आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात पोहोचलं आहे. कारण सगळ्यांना माहित आहे की, अयोध्येच्या राम मंदिरात आणि इतर अनेक मंदिरात ज्या पद्धतीने लुटमार सुरू झाली आहे, मंदिरातल्या दानपेट्या फोडू लागले आहेत, ही फार गंभीर गोष्ट आहे. राम मंदिराच्या चोरीबाबत मला वाटतं बेळगावच्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दुःख व्यक्त केलं.  पण, हे प्रकरण तेवढ्यावर थांबणार नाही, अजून मुख्य आरोपी बाहेर आहेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.  

आंदोलनासाठी सर्वांना आमंत्रित करणार

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरात गैरव्यवहार झालेला आहे, रामरक्षा आंदोलनातून आम्ही हिंदूंना जागं करत आहोत, ढोंगी हिंदुत्ववाद आता संपला पाहिजे. त्यासाठी उद्धव ठाकरे 18 तारखेला सायंकाळी 4.30 वाजता हे आंदोलन करणार आहेत. आम्ही यास आंदोलन म्हणत नाही, हे हिंदूंना जागृत करण्याचं काम आम्ही करतो आहे, असेही राऊत यांनी म्हटले. या आंदोलनासाठी आम्ही सगळ्यांना आमंत्रित करणार आहोत, हे काही एका पक्षाचा आंदोलन नाही, जरी आम्ही पुढाकार घेतला असला तरी संघालाही आमंत्रित करु आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर उपस्थित असतील तर त्यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट करावी.  एवढेच नाही तर राष्ट्रवादी, काँग्रेस सर्वांना आमंत्रित करत आहोत. सगळ्यांनी आंदोलनात यावं, कारण हा राजकीय विषय नाही, राम हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रतीक आहे, संपूर्ण देशातील राजकीय पक्षांनी एकत्र यायला पाहिजे आणि नागपुरात याची सुरुवात करत आहोत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. 

फडणवीसांनाही निमंत्रण देणार

नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुख्यालय आहे, ज्यांना संघाचे विचार मान्य असतील रामाच्या मंदिरात जे लूट झाले आहे त्याची चिंताजन्य वाटते त्या सर्वांनी यावं. मुख्यमंत्री फडणवीस कुठे राहतात, त्यांचा घराचा पत्ता मला माहित नाही, ती जागा मी आता पाहणार आहे, देवेंद्रजी त्या दिवशी घरी असतील तर आम्ही नक्कीच त्यांना आमंत्रित करू, असेही राऊत यांनी म्हटले. तसेच, इतर काही स्थळ उद्या पाहणार आहोत. उद्या आमचे आणखी काही प्रमुख पदाधिकारी येत आहेत, येथील जनतेच्या आणि सगळ्यांच्या सोयीसाठी ते दौरा करत आहेत. 

फडणवीसांना दिल्लीतून आदेश येतात

माझा कोणाकडेही इशारा नाही, रामरक्षा ज्यांना उत्तम प्रकारे बोलता येते त्यांनीच साडेपाचशे कोटी रुपयांची दानपेटी फोडली आहे आणि 14 हजार कोटी लुटले आहे. एकनाथ शिंदे यांना दुसरा काम काय, याला फोडा आणि त्याला फोडा, काही सामाजिक भान, विकासाची दिशा राम मंदिराच्या लुटीवर बोलावं, कोणाला भेटायला गेले. प्रधानमंत्री यांना किंवा अमित शहाणा भेटायला गेले ना, अमित शहा यांनी राम मंदिराच्या लुटीवर काही भाष्य केलं नाही. फडणवीस दखल घेतील असं मला वाटत नाही. भ्रष्टाचारा संदर्भात दखल घेण्याचं कर्तव्य त्यांच्याकडे आहे का? याची मला चिंता वाटते, त्यांना दिल्लीतून आदेश येतात या सगळ्या भ्रष्टाचारांना पाठीशी घाल, असा आरोपही राऊत यांनी केला. 

सहा खासदारांची खासदारकी जाणार

एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरे यांना सूचल मात्र तुम्हाला सुचला आहे का? उशिराच सूचलं असेल किंवा आधी, तुम्हाला तेवढं तरी शहाणपण आहे का? राम मंदिराच्या लुटीबाबत बोलण्याची हिंमत तुमच्यात आहे का, ते असेल तर सांगा? असा सवाल संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना विचारला. तुम्ही जंतर-मंतरला जाऊन पाठिंबा द्या, दिल्लीत आहात अमित शाहांच्या घरापासून जंतर-मंतर साडेतीन मिनिटांवर आहे, तर खासदार श्रीकांत शिंदे जिथे राहतात त्यांच्या घराजवळ आहे, जा आणि बसा, असा सल्लाच राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला. जे सहा लोक शिंदे गटात गेले आहेत त्यांना एवढं सोपं नाही. त्यांची सदस्यता रद्द होणार आहे, हे ना घरचे आणि घाटचे राहणार आहेत. जोपर्यंत ओरिजनल पक्षाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सहा लोकांना अधिकार नाही, संविधानाच्या दहा शेड्युलमध्ये त्याबाबत मार्गदर्शन आहे, असेही राऊत यांनी म्हटले. 

हेही वाचा

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Raut: भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget