एक्स्प्लोर
वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या नागपुरातील घरात चोरी
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे.

नागपूर : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. नागपुरातील उच्चभ्रु शंकरनगर परिसरातील राहत्या घरात चोरीचा प्रकार घडला. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. चोरट्यांनी उमेशच्या घरातून सुमारे 45 हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल फोन लंपास केला. महत्त्वाचं म्हणजे चोरीची घटना घडली, त्यावेळी उमेश यादव नागपुरातच होता. मात्र कुटुंबासोबत पार्टीसाठी बाहेर गेला होता. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात आलं यानंतर उमेद यादवने पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही. मात्र उच्चभ्रू वस्तीत आणि एका खेळाडूच्या घरी चोरी झाल्याने पोलिस चोरट्यांचा प्राधान्याने शोध घेत आहेत.
आणखी वाचा























