एक्स्प्लोर

मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?

मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दिल्लीला 5 गडी राखून पराभूत करून आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

Mumbai Indians: वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार होऊ शकतो. हार्दिक पांड्या आणि एका माजी भारतीय कर्णधाराची अदलाबदल होऊ शकते. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासह कोचिंग स्टाफमध्येही बदल होऊ शकतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय पुढील आठवड्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आढावा बैठकीत घेतला जाऊ शकतो. या बैठकीला अंबानी कुटुंब आणि फ्रँचायझीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्या पाच हंगामांपासून मुंबईची कामगिरी खराब 

गेल्या पाच हंगामांपासून मुंबईची कामगिरी खराब राहिली आहे. गेल्या हंगामात चार सामने जिंकून संघ 8 गुणांसह 9व्या स्थानावर राहिला. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दिल्लीला 5 गडी राखून पराभूत करून आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

हार्दिक पांड्याची नियुक्ती, पण सुधारणा नाही

फ्रँचायझीने 27 नोव्हेंबर 2023 रोजी हार्दिक पांड्याला ट्रेडद्वारे संघात घेतले आणि नंतर त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. तथापि, पांड्याच्या कर्णधारपदी संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली नाही. ड्रेसिंग रूममध्ये मतभेद होते आणि काही अहवालांनुसार गटबाजीही सुरू होती. मात्र, संघ किंवा व्यवस्थापनाने या प्रकरणी मौन बाळगले. ड्रेसिंग रूममधील मतभेद आणि सतत बदलणाऱ्या रणनीतींचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. मुंबईने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली 39 सामने खेळले आहेत, पण केवळ 15 सामने जिंकले आहेत.

कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह आघाडीवर

मुंबई इंडियन्स 2027 च्या हंगामासाठी कायमस्वरूपी कर्णधार नियुक्त करण्याच्या विचारात आहे. संघाला तात्पुरत्या किंवा हंगामी कर्णधारासोबत पुढे जायचे नाही. कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. गेल्या तीन हंगामांपासून त्याची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. हार्दिक आणि सूर्याच्या अनुपस्थितीत आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध बुमराहने संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी तो म्हणाला होता, "मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवण्यापूर्वी मी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होईन अशी कधी कल्पनाही केली नव्हती." बुमराह व्यतिरिक्त तिलक वर्माच्या नावाचीही चर्चा होत आहे, पण टी-20 मध्ये त्याचा अलीकडचा फॉर्म खराब आहे. असे मानले जाते की, कमी वयात कर्णधारपद स्वीकारल्याने त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो.

हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरही प्रश्नचिन्ह

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार हार्दिक पांड्याच्या भविष्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. वृत्तानुसार, अनेक आयपीएल फ्रँचायझी त्याला करारबद्ध करण्यास इच्छुक आहेत. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीनंतरच हार्दिकचे भविष्य स्पष्ट होईल.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
IND vs SL 1st Test DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Embed widget