AFC Champions League 2022 : मुंबई सिटी एफसीने (Mumbai City FC) इतिहास रचला आहे. या संघाने एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये (AFC Champions League 2022) इराकी एअर फोर्स क्लबचा (Iraqi Air Force Club) 2-1 असा पराभव केला. यासह, मुंबई सिटी एफसी एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये सामना जिंकणारा पहिला भारतीय फुटबॉल संघ ठरला आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील किंग फहद स्टेडियममध्ये सोमवारी (11 एप्रिल) रोजी हा सामना पार पडला. मुंबई सिटी एफसीने एक गोलच्या फरकाने नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे इराकी एअर फोर्स क्लब तीन वेळा AFC कप विजेता आहे.


इराकी एअर फोर्सच्या हमादी अहमदने 59 वा गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र मुंबईच्या दिएगो मॉरिसिओने  70व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर राहुल भेकेने 75 व्या मिनिटाला विजयी गोल केला. मुंबई सिटी एफसीची पुढील सामना आता गुरुवारी 14 एप्रिलला अल जझीरासोबत (Al Jazira Club) आहे. या दिवशी एअरफोर्स क्लबचा  (Iraqi Air Force Club) सामना आता अल शहाबशी (Shabab Al Ahli Dubai Club) होणार आहे.






 


मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव
याआधी मुंबई सिटीला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अल शहाबकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला होता. मुंबई सिटी एफसीला शुक्रवारी (9 एप्रिल) एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल पदार्पणाच्या सामन्यात सौदी अरेबियाच्या अल शबाबकडून (Al-Shabab FC) 0-3 असा पराभव पत्करावा लागला.


हाफ टाईमनंतर बदलला खेळ


इराकी एअरफोर्स क्लबविरुद्ध मुंबईने पहिल्या सामन्याप्रमाणेच खेळाची सुरुवात केली. मात्र इराकने मुंबईला पहिल्या 10 मिनिटांतच दोन चुका करण्यास भाग पाडलं. हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. हाफ टाईमनंतर मुंबईने बाजी मारली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha