Runway 34 Trailer : अजय देवगणचा (Ajay Devgn) बहुप्रतिक्षित चित्रपट 'रनवे 34' चा (Runway 34) दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये पायलट विक्रांत खन्ना उर्फ ​​अजय देवगण एका कोंडीशी लढताना दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर 11 एप्रिलला रिलीज झाला आहे. या नव्या ट्रेलरमध्ये, अजय देवगण पायलटच्या भूमिकेत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत विमानात लोकांचे प्राण वाचवताना दाखवले आहे. ‘रनवे 34’ चित्रपटात अजय देवगणसोबत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रकुलप्रीत सिंह (Rakun Preet Singh) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


विक्रांतच्या यशाबद्दल त्याचे कौतुक होणार की, लोकांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल त्याला शिक्षा होणार? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. पण, या ट्रेलरमुळे चित्रपटात घडणाऱ्या नाट्याची संपूर्ण अनुभूती मिळते आणि प्रेक्षकांच्या मनात चित्रपट पाहण्याची उत्सुकताही निर्माण होते. या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरच्या जबरदस्त दृश्यांनी लोकांना भुरळ घातली होती. पहिल्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्यातील संभाषणाची झलक पाहायला मिळाली, तर दुसऱ्या ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि रकुलप्रीत सिंह यांच्या पराक्रमाचे दर्शन घडते. यासोबतच हा ट्रेलर फ्लाइटमध्ये बसलेल्या लोकांच्या भीतीचीही जाणीव करून देतो.


पाहा ट्रेलर :


 







एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट


अजयचा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. अजय देवगण प्रवासी आणि संपूर्ण फ्लाइट क्रूचा जीव धोक्यात घालून सिनेप्रेमींना एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे. या घटनेनंतर, त्याला चौकशीला सामोरे जावे लागते, ज्या दरम्यान त्याने त्याच्या स्व:सन्मानाचे रक्षण केले आहे. 


चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला की, ‘सर्वांना नमस्कार. मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी माझ्या चित्रपटाची एक झलक घेऊन आलो आहे. 'रनवे 34' हा माझा तिसरा दिग्दर्शकीय चित्रपट आहे. पहिल्या ट्रेलरला मिळालेल्या तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे. कॅप्टन विक्रम खन्ना यांच्याबद्दल बरंच काही सांगणारा दुसरा ट्रेलर आज इथे लाँच होत आहे. या चित्रपटात सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्हीही आहेत. मी नियम मोडणारी भूमिका साकारत आहे. मला आशा आहे की, तुम्ही चित्रपट आणि रनवे 34च्या ट्रेलरला भरपूर प्रेम आणि प्रशंसा द्याल.’ हा चित्रपट या महिन्याच्या 29 तारखेला (29 एप्रिल) ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :


Jersey : 'जर्सी' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


Beast : थलापती विजयच्या 'बीस्ट' चित्रपटाच्या निर्मात्यांना फटका; कुवेतनंतर आता 'या' देशांमध्ये देखील बॅन