DHL Aircraft Viral Video : सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेकदा सोशल मीडियावर मनोरंजक व्हिडीओ समोर येतात, तर कधी कधी धक्कादायक व्हिडीओही खूप व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विमान अपघात आणि विमानतळावर आपत्कालीन लँडिंगचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मालवाहू विमान विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे.


मात्र, या विमानाचं इर्मजन्सी लँडीग पाहून साऱ्यांनाचा धक्का बसला आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल. या विमानाचं लँडिंग इतकं भयानक आहे की ते पाहून नेटकऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये डीएचएल (DHL) कंपनीचे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर घसरताना दिसत आहे. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी या विमानाचे चक्क दोन तुकडे झाल्याचं दिसत आहे.







हा व्हिडीओ कोस्टा रिका (Costa Rica) देशातील जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. येथे डीएचएल कंपनीचे बोईंग 757-200 मालवाहू विमान इमर्जन्सी लँडिंग दरम्यान क्रॅश झालं. DHL चे हे बोईंग गौंतमालाला जात होते. मात्र, हायड्रोलिक्स सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. अशा प्रकारे विमानाचे दोन भाग होण्याची घटना सामान्य नाही. 


या विमान अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं डीएचएल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ही दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर DHL कंपनीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha