Pangong Tso Lake : नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक चांगलेच संतापले आहेत. इतकंच नाही, तर व्हिडीओमधील तरुणांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही तरुण गंमत म्हणून त्यांची कार पॅंगाँग तलावाच्या आतमध्ये पाण्यात चालवत आहेत. यावेळी केलेली थोडीशीही चूक महागात पडू शकत होती. हे हा व्हिडीओ पाहून समोर आलं आहे.


खरंतर ही घटना लेहमधील पॅंगाँग लेक (Pangong Lake) येथे घडली आहे, या घटनेचा व्हिडीओ अनेक यूजर्सनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाच्या कारमध्ये दोन पर्यटक मजा करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ते तलावाच्या काठावर त्यांची कार घेऊन पाण्यात उतरताना दिसत आहेत. जवळच काही दारूच्या बाटल्याही दिसत आहेत.


कार पाण्यात उतरवल्यानंतर ते कार वेगाने चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका यूजरने कमेंट करत म्हटलं आहे की, त्यांनी तलावाचे सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न केला आणि तलावातील पाणीही दूषित केलं आहे. त्यांनी दारूच्या बाटल्याही ठेवलेल्या दिसत आहेत.






 


तसेच आणखी एका यूजरने लडाख प्रशासनाकडे या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या लोकांनी तलावाच्या काठावर दारू नेऊन तलाव प्रदूषित केल्याचं म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha