IPL 2022, SRH vs GT: केन विल्यमसनची कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी आणि निरोलस पूरन, मार्करमचा फिनिशिंग टचच्या बळावर हैदराबादने गुजरातचा आठ गड्यांनी पराभव केला. या विजयासह हैदराबाद संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील दुसरा विजय साजरा केला. चार गुणांसह हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर पोहचला आहे. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने दिलेले 163 धावांचे आव्हान हैदराबाद संघाने पाच चेंडू आणि आठ गडी राखून सहज पार केले. केन विल्यमसन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करताना संयमी अर्धशतक झळकावले. 


163 धावांच्या आव्हानाचा पाठलगा करताना केन विल्यमसन आणि अभिषेख शर्मा यांनी 8.5 षटकांत 64 धावांची दमदार सलामी दिली. अभिषेक शर्माने 32 चेंडूत 42 धावांची महत्वाची खेळी केली. कर्णधार केन विल्यमसन याने 46 चेंडूत चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. राहुल त्रिपाटी दुखापत झाल्यानंतर 17 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर निकोलस पूरन आणि एडन मार्करन यांनी तुफानी फटकेबाजी करत हैदराबादला विजय मिळवून दिला. निकोलस पूरनने 18 चेंडूत 34 तर मार्करन याने 8 चेंडूत 12 धावांची खेळी केली. 


दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या  गुजरात टायटन्स (SRH vs GT) संघाने कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर  निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंत मजल मारली.  हार्दिक आणि अभिनव मनोहर यांनी केलेल्या एका उत्तम भागिदारीमुळेच गुजरातने एक आव्हानात्मक लक्ष्य हैदराबादसमोर ठेवता आले.  हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत एकमागोमाग एक विकेट्स घेतल्या. गुजरातचे गडी एकामागोमाग एक बाद होत असताना एका बाजूला कर्णधार हार्दिकने लढा कायम ठेवला. त्याने 42 चेंडूत नाबाद 50 धावा ठोकल्या. काही काळासाठी अभिनव मनोहर (35) याची त्याला साथ देखील मिळाली. ज्यामुळे 20 षटकात 7 गडी गमावात गुजरातने 162 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर, टी. नटराजन यांनी प्रत्येकी दोन तर मार्को आणि उम्रान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तर गुजरातचा एक गडी धावचीत झाला.