एक्स्प्लोर

VIDEO: धोनीची जबरदस्त विकेटकीपिंग, एका क्षणात स्टम्पिंग!

ओव्हल (इंग्लंड) : विकेटकिपर महेंद्रसिंह धोनीचं भलेही वय वाढत असलं तरीही धोनीच्या कीपिंग आजही तितकीच जबरदस्त आहे. हे त्यानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. काल (रविवारी) न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात धोनीनं आपल्या उत्कृष्ट कीपिंगचा नमुना पेश केला. न्यूझीलंडचा फलंदाज कॅलिन डी ग्रँडहोमला ज्या पद्धतीनं धोनीनं बाद केलं त्यावरुन त्याची चपळता दिसून येते. 23व्या शतकात न्यूझीलंडचा फलंदाज ग्रँडहोम जाडेजाच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका मारण्यासाठी क्रीजमधून बाहेर आला. त्यानंतर धोनीनं डोळ्याची पापणी लवते न लवते तोच एक जबरदस्त स्टम्पिंग करुन ग्रँडहोमला माघारी धाडलं. अवघ्या 4 धावा करुन तो बाद झाला. या सराव सामन्यात टीम इंडियाने ओव्हलच्या मैदानावर डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडवर 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला. गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमारच्या प्रभावी माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. दोघांनीही प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडचा डाव 38.4 षटकांमध्येच आटोपला. त्यांनी भारतासमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतल्यानंतर शिखर धवन आणि त्याच्या साथीला आलेल्या विराट कोहलीने शानदार भागीदारी रचली. विराटने नाबाद 52, तर शिखर धवनने 40 धावांची खेळी रचली. शिखर धवननंतर आलेला दिनेश कार्तिक खातंही न उघडता माघारी परतला. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी आणि विराटने यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच पावसाने व्यत्यय आणला. (व्हिडिओ: अशोक डिंडा ट्विटर) भारतीय गोलंदाजांची दिलासादायक कामगिरी पाऊस न थांबल्याने अखेर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारताने न्यूझीलंडवर 45 धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी केलेली सराव सामन्यातील कामगिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला मोठा दिलासा आहे. फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. बांगलादेशविरुद्ध दुसरा सराव सामना चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. 4 जून रोजी हा सामना खेळवला जाईल. 8 जूनला श्रीलंकेसोबत भारताचा सामना असेल, तर 11 जून रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दरम्यान, या सामन्यांपूर्वी टीम इंडिया दोन सराव सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना 28 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. तर दुसरा सराव सामना 30 मे रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे. पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका संबंधित बातम्या: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 45 धावांनी मात

महत्त्वाच्या बातम्या

Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Ravichandran Ashwin : यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
यॉर्करचा बादशाह भारतीय संघात परतणार का? आर. अश्विनच्या वक्तव्यामुळे 2027 च्या विश्वचषकासाठी भुवनेश्वर कुमारच्या नावाची जोरदार चर्चा
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
Embed widget