एक्स्प्लोर

साक्षी नव्हे तर 'ही' होती धोनीची पहिली गर्लफ्रेण्ड!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंहच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. धोनीबाबत माहित नसलेल्या काही गोष्टी या चित्रपटातून उलगडणार आहेत. धोनीच्या जीवनातील अशीच एक महत्त्वाची घटना म्हणजे त्याची पहिली प्रेयसी. नीरज पांडे दिग्दर्शित 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात धोनीच्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यापैकी एक म्हणजे त्याचं पहिलं प्रेम, त्याची प्रेयसी, असं वृत्त 'मुंबई मिरर'ने प्रकाशित केलं आहे.   होय, साक्षी धोनीच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याचं प्रियांका झा नावाच्या तरुणीवर जीवापाड प्रेम होतं. इतकंच नाही तर आयुष्यभर एकत्र राहायच्या आणाभाकाही दोघांनी घेतल्या होत्या. पण नियतीला हे मान्य नव्हतं. एका अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2002 मध्ये, जेव्हा धोनी विशीत होता, स्ट्रगल करत होता, त्यावेळी प्रियांका त्याच्यासोबत होती. संपूर्ण आयुष्य सोबत घालवायचं असं वचन त्यांनी एकमेकांना दिलं होतं. मात्र त्याच काळात म्हणजेच 2003-04 मध्ये झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी 'भारत अ' संघात धोनीची निवड झाली. त्यानंतरच्या काही मालिकांमधील त्याच्या कामगिरीकडे सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांचं लक्ष गेलं आणि 2004 मध्ये त्याची भारताच्या वन डे संघात निवड झाली.   यादरम्यान आंतरराष्ट्रीय किकेटसाठी धोनीचे परदेश दौरे सुरु होते. बिझी शेड्यूलमुळे तो प्रियांकाला भेटूही शकत नव्हता.   या काळात सर्वच बदललं. क्रिकेट दौऱ्यावरुन परतल्यानंतर त्याला असा धक्का बसला की, ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नाही. धोनीच्या प्रियांकाने या जगाचा निरोप घेतला होता. एका रस्ते अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.   प्रियांच्या मृत्युच्या धक्कातून धोनी वर्षभर सावरलाच नव्हता. प्रियांकाची आठवण येऊ नये म्हणून त्याने स्वत:ला क्रिकेटमध्ये बिझी ठेवलं.   भारतीय संघात निवड झाल्यानंतर धोनी हळूहळू सावरला. त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. त्याची कामगिरी सुधारली. 2005 मध्ये विशाखापट्टणममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या  सामन्यात त्याने 148 धावा केल्या. त्याने मागे वळून पाहिलं नाही. धोनीला भारतीय वन डे संघाचं कर्णधारपद मिळालं.     यानंतर महेंद्रसिंग धोनीने 4 जुलै रोजी साक्षी रावतसोबत लगीनगाठ बांधली. या दोघांच्या संसाराच्या वेलीवर 'जिवा' नावाचं सुंदर फूल उमललं. आता धोनी साक्षी आणि जिवासह आनंदाचं आयुष्य जगत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : राज ठाकरेंना शिंदेंच्या लेकाकडून खास गिफ्ट, राज-दिघेंच्या फोटोची फ्रेमRaj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget