एक्स्प्लोर
आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्याने दुष्काळात फरक नाही : धोनी
मुंबई : दुष्काळी परिस्थितीत राज्यात आयपीएल सामने खेळवण्याबद्दल रायझिंग पुणे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपलं मतं नोंदवलं आहे. सध्या दुष्काळाचा प्रश्न खरंच गंभीर आहे, मात्र आयपीएलचे काही सामने राज्याबाहेर हलवण्याने दुष्काळाच्या परिस्थितीत फरक पडणार नाही,
त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं धोनीने म्हटलं आहे.
“काही धरणात पाणीसाठा कमी झाला आहे, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर नेल्याने हा प्रश्न सुटणार नाही. दुष्काळावर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.” असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आयपीएलच्या नवव्या मोसमातील क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याची मागणी मुंबई भाजपने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यासंबंधी कोर्टात याचिकाही करण्यात आली होती. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान पाण्याची मोठी नासाडी होत असल्याचा आरोप याचिकाकर्ते आणि मुंबई भाजपचा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आयपीएल महाराष्ट्राबाहेर खेळवण्यास हरकत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेल्यास आता राज्याचं 100 कोटींचं नुकसान होईल, असा दावा बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी केला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement