एक्स्प्लोर
भारताला मायदेशात हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी खेळी
मेलबर्न : भारताला मायदेशात हरवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवी खेळी खेळली आहे. भारतीय संघाचे माजी गोलंदाज श्रीधरन श्रीराम आणि इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर यांची ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारताविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी फिरकी गोलंदाजांना प्रशिक्षित करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरसोबत करार केला आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
मॉन्टी पानेसर सध्या सिडनीमध्ये क्लब क्रिकेट खेळ आहे. क्लब क्रिकेटचा मोसम संपल्यानंतर तो भारत दौऱ्यासाठी निवड झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करेल.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यात आणि ट्वेण्टी-20 विश्वचषकादरम्यान श्रीधरन श्रीराम यांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन केलं होतं. ऑस्ट्रेलियाचे फिरकी गोलंदाज आता भारतात दाखल होण्याआधी, दुबईत आयसीसीच्या अकॅडमीत श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार असून, श्रीराम ऑस्ट्रेलियन संघासोबतच भारतात दाखल होतील.
त्याआधी पानेसर ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करेल. भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात नॅथन लायन, स्टीव्ह ओ'कीफ, अॅश्टन अॅगर आणि मिचेल स्वेपसन या चार फिरकी गोलंदाजांचा समावेश झाला आहे.
34 वर्षीय मॉन्टी पानेसरची भारतामधील उत्तम होती. 2012-13 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत 17 विकेट्स घेऊन पानेसरने इंग्लंडला मालिका विजय मिळवून दिला होता. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने त्याची फिरकीपटूंचा सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. मॉन्टी पानेसरने त्याचा अखेरचा कसोटी सामना 2013-14 मध्ये खेळला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement