एक्स्प्लोर
पाकिस्तानी संघाचं विजयाबद्दल कौतुक, मोहम्मद कैफ ट्विटरवर ट्रोल
पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाचं कैफने कौतुक केल्याने काही चाहते भडकले. त्यामुळे आता ट्विटरवर मोहम्मद कैफला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

कैफने ट्विट करुन, धोनीच्या बायोपिकाची कथा तरुणांसाठी प्रेरणादायी असून आपली स्वप्न साकार करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, असं म्हटलं आहे.
मुंबई : तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्याबद्दल पाकिस्तानच्या संघाचं कौतुक केल्याने भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफला ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.
मोहम्मद कैफने एक ट्वीट करत दमदार कामगिरी केल्याबद्दल पाकिस्तानच्या संघाचं आणि फलंदाज फखर झमानचं कौतुक केलं. पण पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानी संघाचं कैफने कौतुक केल्याने काही चाहते भडकले. त्यामुळे आता ट्विटरवर मोहम्मद कैफला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
‘टी-ट्वेण्टी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्याबद्दल पाकिस्तानचं अभिनंदन. फखर झमानची खेळी उत्तम होती. तो मोठ्या सामन्यांतील हुकमी खेळाडू आहे,’ असं कैफने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियात वैयक्तिक मत व्यक्त केल्यानंतर सेलेब्रिटींचं ट्रोलिंग होण्याच्या घटना गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.कैफलादेखील अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.Well done to Pakistan on winning the T20 series final against Australia. Great innings from Fakhar Zaman , looks a big match player. Congratulations #PakvAus
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 8, 2018
देशद्रोही ???????????????? @MohammadKaif
— Deepika Padukone FC (@deepikapadukonz) July 8, 2018
पाकिस्तान के जीतने पर आपको भी खुशी होती है???????????
— Bhanu Prakash Shukla (@BhanuPr04418388) July 8, 2018
दरम्यान, टी-20 तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 183 धावांत रोखलं. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना फखर झमानने 46 चेंडूंत 91 धावांची तडाखेबंद खेळी केली. तसंच अनुभवी शोएब मलिकनेही नाबाद 43 धावा फटकावल्या. यामुळे पाकिस्ताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवला.पाकिस्तान के प्रति प्रेम क्या बात है ।
— ABHI (@ABHISHE06547693) July 8, 2018
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
वाशिम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















