एक्स्प्लोर
मोहम्मद शमी इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेला मुकणार?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्धच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या आगामी मालिकेला मुकावं लागू शकतं. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान शमीच्या गुडघेदुखीनं उचल खाल्ली होती. त्यामुळं शमीला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याआधीही शमीच्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीनं वारंवार डोकं वर काढलं होतं. त्यामुळं डॉक्टरांनी शमीला अजून काही आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शमीच्या गैरहजेरीत भारताच्या वन डे संघात ईशांत शर्मा किंवा आशीष नेहराला स्थान मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा























