Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचं प्लॅनिंग, लॉर्डस कसोटीत भयंकर कट? भारताच्या माजी खेळाडूनं इंग्लंडच्या दोन क्रिकेटपटूंचं नाव घेतलं
Jasprit Bumrah : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला जखमी करण्याचं धोकादायक प्लॅनिंग इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरचं होतं असा दावा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं केलं.

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनं केलेल्या दाव्यामुळं खळबळ उडाली आहे. लॉर्डस कसोटीत बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर या दोघांनी जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचा कट रचल्याचा दावा मोहम्मद कैफनं केला आहे. लॉर्डस कसोटीत रवींद्र जडेजानं जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या जोडीनं भारताला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. जडेजानं बुमराह आणि सिराजसोबत केलेल्या भागीदारीमुळं इंग्लंडला केवळ 22 धावांनी विजय मिळाला.
जसप्रीत बुमराहनं रवींद्र जडेजा सोबत मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. बुमराहनं लॉर्डस कसोटीच्या पाचव्या दिवशी 54 बॉलचा सामना केला होता. भारताला लॉर्डस कसोटीत विजयासाठी 193 धावा करायच्या होत्या. मात्र, भारताला त्या करता न आल्यानं पराभव स्वीकाराव लागला.
मोहम्मद कैफनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना एक दावा केला आहे. लॉर्डस कसोटीत शेवटच्या विकेट लवकर मिळत नसल्यानं इंग्लंडचा संघ अस्वस्थ झाला होता. त्यामुळं इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी जसप्रीत बुमराहला टार्गेट करण्याचा प्लॅन केला. बुमराहवर बॉऊन्सरचा मारा करण्याचा निर्णय घेतला होता, असं कैफ म्हणाला. मोहम्मद कैफनं पुढं म्हटलं की स्टोक्स आणि आर्चर या दोघांनी जर बुमराहला बाद करता आलं नाही तर त्याला मँचेस्टर कसोटीपूर्वी जखमी करण्याबाबत ठरवलं होतं.
कैफ म्हणाला, " स्टोक्स आणि आर्चर या दोघांनी बुमराहवर बाऊन्सरचा मारा करायचं ठरवलं होतं, जर बुमराह बाद झाला नाही तर त्याच्या खांद्यावर आणि हाताच्या बोटांवर मारा करायचं ठरलं होतं. यावरुन त्या गोलंदाजांची विरोधी संघाच्या ज्याच्या विरुद्ध त्यांचे फलंदाज संघर्ष करतात त्या मुख्य गोलंदाजाला दुखापत करण्याची मानसिकता दिसून येते. या प्लॅनला नंतर यश आलं आणि जसप्रीत बुमराह बाद झाला, असा दावा कैफनं केला आहे.
जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार?
इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाच्या व्यवस्थापनानं जसप्रीत बुमराह या मालिकेत तीन कसोटी सामने खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं. बुमराह पहिल्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळला आहे. बर्मिंघम कसोटीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्या कसोटीत भारतानं विजय मिळवला होता.
भारताचा माजी फिरकीपटू आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यानं जिओ हॉटस्टारवर बोलताना जसप्रीत बुमराहनं मँचेस्टर कसोटीत खेळलं पाहिजे असं म्हटलं. जर, जसप्रीत बुमराह मँचेस्टर कसोटीत खेळला नाही तर भारताचा पराभव निश्चित असल्याचं कुंबळेनं म्हटलं. मँचेस्टर कसोटीत भारताचा पराभव झाल्यास मालिका हातून जाईल. जसप्रीत बुमराहनं राहिलेल्या दोन्ही कसोटी मॅच खेळल्या पाहिजेत, असं देखील अनिल कुंबळेनं म्हटलं. याशिवाय जसप्रीत बुमराहनं या दोन कसोटी खेळल्यानंतर दीर्घ ब्रेक घ्यावा, भारतातील मालिकेत खेळला नाही तरी चालू शकतं. तुम्हाला ब्रेक हवा असेल तर घेऊ शकता. मात्र, बुमराहनं पुढील कसोटी खेळली पाहिजे, असं अनिल कुंबळेनं लॉर्डस कसोटीनंतर म्हटलं होतं.
























