(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs RCB Live Score : रोमांचक सामन्यात विराटच्या आरसीबीची रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने मात
MI vs RCB Live Score: IPL 2021 Live Updates : गेल्यावर्षीचा आयपीएलचा किताब जिंकणारा संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यात चेन्नईमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासून आयपीएलच्या 14व्या सीझनची सुरुवात होणार आहे.
LIVE
Background
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात शुक्रवारी होणार आहे. गेल्यावर्षीचा आयपीएलचा किताब जिंकणारा संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याच्यात चेन्नईमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापासून आयपीएलच्या 14व्या सीझनची सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मुंबईवर मात करुन यंदाच्या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ 2013 नंतर पहिल्यांदाच आगामी सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणारा मुंबईचा संघ गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचा किताब जिंकत आहे. त्यामुळे यंदा मुंबईचा संघ आयपीएलचा किताब तिसऱ्यांदा जिंकत विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु, यंदा रोहित शर्माला पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी डी कॉकऐवजी क्रिस लिनसोबत ओपनिंगची जबाबदारी स्विकारावी लागणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर इशान किशन फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी ताकद त्यांचे ऑलराउंडर हार्दिक पांड्या, किरण पोलार्ड आणि क्रुणाल पांड्या हे आहेत. हे तिनही खेळाडू टॉप ऑर्डर फ्लॉप झाल्यानंतर टीमला मोठ लक्ष्य गाठण्यासाठी मदत करतात.
गोलंदाजीची जबाबदारी मुंबईच्या संघात ट्रेंट बोल्ट आणि राहुल चाहर यांच्या खांद्यावर असणार आहे. जसप्रीत बुमराह एक महिन्याच्या ब्रेकनंतर क्रिकेटच्या मैदानात वापसी करणार आहे. याव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स नाथन कुल्टर नाइलला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मैदानावर उतरवू शकते.
मुंबईवर मात करण्यासाठी आरसीबीचा संघ सज्ज
मुंबई इंडियन्सवर मात करण्यासाठी आरसीबीचा संघ आज मैदानावर उतरणार आहे. कर्णधार विराट कोहली या सीझनमध्ये देवदत्त पडिकलसोबत ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानावर उतरणार आहे.
आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलवर 14.2 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने आपली मिडल ऑर्डर मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. एबी डीविलियर्स पहिल्याप्रमाणेच आताही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच तो विकेटकिपर म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहे.
आरसीबीच्या संघात ऑलराऊंडर जेमीसनवर सर्वांची नजर असणार आहे. आपसीबीने जेमीसनवर 15 कोटी रुपयांची बोली लावली आहे. न्यूझीलंडमध्ये जेमीसनने टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम प्रदर्शन केलं आहे. परंतु, लिमिटिड ओवर्स क्रिकेटमध्ये तो महागडा खेळाडू ठरत आहे.
अशी असू शकते Playing 11 :
मुंबई इंडियन्स : क्रिस लिन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), कीरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, नाथन कुल्टर नाइल, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिकल, मोहम्मद अजहरुद्दीन, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स (विकेटकीपर), डॅनियल क्रिस्टियन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, काइल जॅमीसन, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.
रोमांचक सामन्यात विराटच्या आरसीबीची रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने मात
MI vs RCB Live Score : रोमांचक सामन्यात विराटच्या आरसीबीची रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सवर 2 विकेट्सने मात, शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय
सामन्याचा रोमांच शिगेला, डिव्हिलियर्स धावबाद, आरसीबीला दोन चेंडूत दोन धावांची गरज
सामन्याचा रोमांच शिगेला, डिव्हिलियर्स धावबाद, आरसीबीला दोन चेंडूत दोन धावांची गरज
आरसीबीला 24 चेंडूत 39 धावांची गरज, एबी डिव्हिलियर्स मैदानात, सामना रंगतदार स्थितीत
आरसीबीला 24 चेंडूत 39 धावांची गरज, एबी डिव्हिलियर्स मैदानात, सामना रंगतदार स्थितीत
आरसीबीला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल 39 धावांवर बाद
MI vs RCB Live Score : आरसीबीला मोठा धक्का, ग्लेन मॅक्सवेल 39 धावांवर बाद, आता मदार एबी डिव्हीलियर्सच्या खांद्यावर
RCB चा कर्णधार विराट कोहली बाद
RCB चा कर्णधार विराट कोहली बाद, बुमराहनं घेतली विकेट, विराट 33 धावांवर बाद, आरसीबीला विजयासाठी 42 चेंडूत 61 धावांची गरज