एक्स्प्लोर
Advertisement
पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द
लंडन : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांममधला चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा साखळी सामना अखेर पावसाच्या व्यत्ययामुळं रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे उभय संघांना एकेक गुण विभागून देण्यात आला.
पावसामुळे हा सामना 33 षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 33 षटकांत 235 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची नऊ षटकांत तीन बाद 53 अशी दाणादाण उडाली. त्याच वेळी आलेल्या पावसाने या सामन्यात तिसऱ्यांदा खेळ थांबवण्याची वेळ आली. त्यानंतर खेळ सुरु होऊ शकला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कर्णधार केन विल्यमसनच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 45 षटकांत सर्व बाद 291 धावांची मजल मारली. विल्यमसनने 97 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांसह 100 धावांची खेळी केली.
सलामीच्या ल्यूक रॉन्कीने 65 आणि रॉस टेलरने 46 धावांची खेळी करून त्याला उत्तम साथ दिली. विल्यमसनने रॉन्कीच्या साथीने 77 धावांची आणि टेलरच्या साथीने 99 धावांची भागीदारी रचली.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत अ गटात इंग्लंड सध्या 2 गुणांसह अव्वल स्थानी आहे. इंग्लंडने कालच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement