(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kajol Sargar in Khelo India : सांगलीत पानपट्टी चालवणाऱ्याच्या मुलीला खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
काजोल सरगर (Kajol Sargar) सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील पानटपरी चालवतात, तर आई छोटेसे हॉटेल चालवते. अत्यंत गरिबीतून कष्टातून काजोलने गेली तीन वर्षे वेटलिफ्टिंगसाठी तयारी सुरू केली होती.
Sangli : सांगलीत पानपट्टी चालवणाऱ्याच्या मुलीने खेलो इंडिया (Khelo India) स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. वेटलिफ्टिंग खेळात काजोल महादेव सरगर हिने (Kajol Sargar) 40 किलोखालील वजनी गटात महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले. खेलो इंडिया नंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.
काजोल सरगर (Kajol Sargar) ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील महादेव सरगर एक पानटपरी चालवतात, तर आई छोटेसे हॉटेल चालवते. अत्यंत गरिबीतून कष्टातून काजोलने गेली तीन वर्षे वेटलिफ्टिंगसाठी तयारी सुरू केली होती. सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूटमध्ये काजोल आपले कोच मयूर सिंहासने यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे.
मोठ्या जिद्दीने तिने प्रशिक्षण घेत हरियाणा येथे 5 जून रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने 40 किलो वजनी गटात सहभाग घेतला. या वजनी गटात एकूण 13 खेळाडू स्पर्धक सहभागी होते. या सर्वांना मागे टाकत काजोलने 3 लिफ्ट क्लिअर करत सुवर्णपदक पटकावले. काजोलच्या कष्टामुळे आज महाराष्ट्राला वेट लिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळालं आहे. याबद्दल काजोलच्या चेहऱ्यावर एक अभिमानाचा भाव आहे. यापुढे जाऊन काजोलला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून आपल्या देशासाठी सुवर्णपदक आणायची इच्छा असून ऑलम्पिकसाठी सुद्धा तिने तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्राची नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता
दरम्यान, जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे महाराष्ट्राची नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. काल दोन सुवर्णपदके मिळवून दिली. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर 200 मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्ण पदक उंचावले. त्यात 2.18.39 सेकंदाची वेळ नोंदवून इंडियातील बेस्ट टायमिंग दिला. 4 बाय 100 फ्रीस्टाईल रिलेमध्ये सायंकाळी उशिरा एक रौप्य पदक आलं. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या