एक्स्प्लोर

Khelo India Youth Games: नंबर वनसाठी महाराष्ट्र-हरियाणात टक्कर

Khelo India Youth Games: खेलो इंडिया युथ गेम्सचय्या पदकतालिकेत अव्वल येण्यासाठी महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात कालपासून झुंज पाहायला मिळत आहे.

Khelo India Youth Games: खेलो इंडिया युथ गेम्सचय्या पदकतालिकेत अव्वल येण्यासाठी महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात कालपासून झुंज पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रानं कालपासून हरियाणावर पदकतालिकेत आघाडी घेतलीय. मात्र, ही आघाडी फक्त एकाच सुवर्ण पदकाची आहे. त्यामुळं स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच उद्या (13 जून) हातघाईची लढाई होणार आहे. महाराष्ट्राचे खो-खोचे दोन्ही संघानं फायनलमध्ये धडक दिल्यानं ती सुवर्णपदके हक्काची समजली जात आहेत. टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्रानं दमदार प्रदर्शन करून दाखवलंय. ज्यामुळं हरियाणासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर, हरियाणाचे शक्तिस्थान समजल्या जाणाऱ्या बॉक्सिंगमध्येच त्यांची आणि महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. कारण महाराष्ट्राचे चार बॉक्सर गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत.

आज चार सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदके मिळाली.आर्चरीमध्ये एक सुवर्णपदक आलं. त्यांनी रौप्य पदकही मिळवून दिलं. टेबल टेनिसमध्ये दीया चितळे पुन्हा सुवर्ण घेऊन आली. जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळं सुवर्णसंख्या वाढली. तिनं आज दोनदा सुवर्ण कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये मात्र तब्बल पाच कांस्य पदके आली. सिमरन वर्मा (मुंबई), रशिका होले (सातारा), आदित्य गौड (पुणे), माणिक सिंग (अकोला), सई डावखर (पुणे) यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राची पदकसंख्या शंभरीपार नेली. आज सकाळी आर्चरीमध्ये कम्पाउंडमध्ये सातारच्या आदिती स्वामीने सुवर्णपदक मिळवून दिले. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्य पदक मिळाले.

महाराष्ट्राची नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता
जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे महाराष्ट्राची खरोखरच नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने आजही पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला. आज दोन सुवर्णपदके मिळवून दिली. 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर 200 मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्ण पदक उंचावले. त्यात 2.18.39 सेकंदाची वेळ नोंदवून इंडियातील बेस्ट टायमिंग दिला. 4 बाय 100 फ्रीस्टाईल रिलेमध्ये सायंकाळी उशिरा एक रौप्य पदक आलं. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.

पुण्याचा व्हिक्टर सिंह चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढणार
बॉक्सिंगमध्ये व्हिक्टर सिंग (पुणे) हा चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढेल. सुरेश विश्वनाथची फाईट हरियानाच्या आशिषसोबत आहे. विजय सिंग उत्तर प्रदेशच्या आकाश कुंदीरसोबत तर कुणाल घोरपडे याचा हरियानाच्याच दीपकसोबत सामना होईल. महाराष्ट्राचे अंतिम सामन्यात उतरणारे सर्व बॉक्सर हे पुण्याचे आहेत.

टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत महाराष्ट्राला सुवर्णपदक
टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत मुंबईच्या दीया चितळेने आज पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिलं. तिनं दिल्लीच्या लतिका नारंग हिचा पराभव केला. उद्या (सोमवारी) दिल्लीच्याच आदर्श क्षेत्रीसोबत महाराष्ट्राच्या दीपित पाटीलचा कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.

पदकतालिका-

राज्य सुवर्ण कांस्य रौप्य एकूण
महाराष्ट्र 40 35 29 104
हरियाणा 39 34 42 115
कर्नाटक 21 14 22 57


(ही आकडेवारी आज सायंकाळी 6.10 वाजताची आहे.)

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI : रोहित, विराट, श्रेयस शून्यावर बाद; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, पहिल्या षटकात टीम इंडियासोबत नको ते घडलं, सगळेच चक्रावले
रोहित, विराट, श्रेयस शून्यावर बाद; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, पहिल्या षटकात टीम इंडियासोबत नको ते घडलं, सगळेच चक्रावले
IND vs NZ 4th ODI LIVE : रोहित-इशानच्या एका चुकीची भारताला मोठी किंमत! विल यंगने ठोकलं शतक, टीम इंडियासमोर 334 धावांचं आव्हान
IND vs NZ 4th ODI LIVE : रोहित-इशानच्या एका चुकीची भारताला मोठी किंमत! विल यंगने ठोकलं शतक, टीम इंडियासमोर 334 धावांचं आव्हान
IND vs NZ 4th ODI : दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Embed widget