एक्स्प्लोर
खेलो इंडियाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंची सोनेरी कामगिरी
महाराष्ट्राच्या शुभम कोळेकर आणि अभिषेक महाजनने खेलो इंडियाच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी कामगिरी बजावली. शुभम कोळेकरने 21 वर्षांखालील वयोगटाच्या 55 किलो गटात क्लीन अँड जर्कमध्ये 139 किलो या नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक जिंकलं आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या वेटलिफ्टर शुभम कोळेकर आणि अभिषेक महाजनने खेलो इंडियाच्या पहिला दिवस सोनेरी कामगिरी करत गाजवला आहे. तर वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्तीतही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची सोनेरी कामगिरी महाराष्ट्राच्या शुभम कोळेकर आणि अभिषेक महाजनने खेलो इंडियाच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी कामगिरी बजावली. शुभम कोळेकरने 21 वर्षांखालील वयोगटाच्या 55 किलो गटात क्लीन अँड जर्कमध्ये 139 किलो या नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक जिंकलं आहे. त्याने स्नॅचमध्ये 97 किलोसह एकूण 236 किलो वजन उचललं. शुभम सांगलीत संतोष सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. वेटलिफ्टिंगच्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या 55 किलो वजनी गटात अभिषेक महाजनने सुवर्णपदक पटकावल आहे. त्यानं स्नॅचमध्ये 90 तर क्लीन अँड जर्कमध्ये 121 असं 211 किलो वजन उचललं. महाराष्ट्रच्या प्रशांत कोळीनं याच गटात कांस्यपदकाची कमाई केली. मुलींच्या वेटलिफ्टिंग प्रकारात सौम्या दळवीने महाराष्ट्राला सोनेरी कमाई करून दिली आहे. 17 वर्षांखालील मुलींच्या 40 किलो वजनी गटात सौम्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. सौम्या दळवीने या प्रकारात एकूण 111 किलो वजन उचललं आहे. जिम्नॅस्टिक्स प्रकारात महाराष्ट्राची दोन पदकांची कमाई खेलो इंडियाच्या जिम्नॅस्टिक्स प्रकारात पहिल्या दिवशी महाराष्ट्राने दोन पदकांची कमाई केली आहे. ठाण्याच्या श्रेया भंगाळेने 17 वर्षांखालील मुलींच्या सर्वसाधारण अॅपरेटस प्रकारात रौप्यपदक पटकावलं. जम्मू काश्मीरची बावलीन कौर या प्रकारात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. याच प्रकारात मुंबईच्या क्रिशा छेडाने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिल आहे. श्रेया भंगाळे ही ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया प्रशालेत शिकत असून, ती पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तर क्रिशा छेडा ही मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयात शिकत असून, तिला वर्षा उपाध्ये आणि क्षिप्रा जोशी यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. महाराष्ट्राच्या पैलवानांची कुस्तीत तीनही पदकांची कमाई खेलो इंडियात महाराष्ट्राच्या पैलवानांनी ग्रीको रोमन प्रकारात पहिल्या दिवशी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझ अशी पाच पदकं पटकावली. प्रवीण पाटीलनं 17 वर्षांखालील वयोगटाच्या 55 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक पटकावलं. त्यानं हरयाणाच्या ललितकुमारवर मात केली. मूळचा कोल्हापूरचा असलेला प्रवीण पाटील हा संदीप वांजळे यांचा पठ्ठ्या आहे. महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर देसाई आणि पृथ्वीराज खडके यांना रौप्यपदकावर तर अमृत रेडेकर व कुंदनकुमार यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्राईम
लातूर























