एक्स्प्लोर

Maharashtra Kesari : नांदेडचा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला आस्मान दाखवत सलग दुसऱ्यांदा पटकावली गदा

Dharashiv Maharashtra Kesari : काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान शिवराज राक्षे याने सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. त्याने हर्षवर्धन सदगीरवर 6-0 अशी मात केली. 

धाराशिव: राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेत मूळचा पुण्याचा, पण नांदेडकडून खेळणारा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) महाराष्ट्र केसरी किताबाचा (Maharashtra Kesari 2023) मानकरी ठरला. शरद पवार आश्रयदाते असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या राज्य विजेतेपद कुस्तीत शिवराज सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला. त्यानं किताबाच्या कुस्तीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा (Harshawardhan Sadgir)  6-0 असा सहा गुणांच्या फरकानं पराभव केला. 

शिवराज आणि हर्षवर्धन हे दोघंही काका पवारांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे पैलवान आहे. त्यातही शिवराज राक्षे हा मूळचा पुण्याच्या खेड तालुक्यातल्या राक्षेवाडीचा पैलवान आहे. रामदास तडस अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या राज्य विजेतेपद स्पर्धेत शिवराजला महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीत सिकंदर शेखकडून 28 सेकंदात हार स्वीकारावी लागली होती.

धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचे आयोजक सुधीर पाटील आणि मुख्य कार्यवाहक अभिराम पाटील व मान्यवरांच्या हस्ते नांदेडचा शिवराज राक्षे याला 65 वा महाराष्ट्र केसरी किताब, महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घरण्याकडून परंपरेने चालत आलेले चांदीची गदा देण्यात आली. उपमहाराष्ट्र केसरी मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला मान्यवरांच्या हस्ते महिंद्रा 575 DI व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षी पासून देण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले .

धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलावरील क्रीडा नगरीमध्ये 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या 65 महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते. आज झालेल्या रुस्तुम-ए - हिंद हश्चिचंद्र बिराजदार आखाड्यावर रंगलेल्या उपांत्य चुरशीच्या लढतीत नांदेडाचा शिवराज राक्षे आणि मुंबई पाश्चिम उपनगराकडून खेळणारा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात गादी गटात चुरशीची लढत झाली. या एकतर्फी लढतीत 6 - 0 गुणांने नांदेडचा शिवराज राक्षे विजयी झाला. माती गटात झालेल्या हिंगोलीचा गणेश जगताप विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेल्या लढतीत 2-6 ने नाशिकचा हर्षवर्धन सदगीरने बाजी मारली. 

महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीसाठी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे या दोन मल्लानी धडक मारली. यानंतर 20 मिनिटांच्या विश्रांतीनंतर या दोन मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता . या अटीतटीच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले होते. शेवटच्या या अंतिम लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या मल्लात झालेल्या मॅटवरील कुस्तीत या 6-0 गुणांनी नांदेडचा शिवराज राक्षे या पैलवानाने प्रतिस्पर्धी मल्लावर मात करत महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब पटकावला.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Embed widget