एक्स्प्लोर
धोनीच्या निवृत्तीचा सस्पेन्स कायम, वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही?
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. धोनी कधी निवृत्त होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. धोनी कधी निवृत्त होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. जगातला सर्वोत्तम मॅचफिनिशर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने विश्वचषक स्पर्धेत त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवला नाही, त्यामुळे अनेक क्रिकेटरसिक चिंतेत आहेत. तर धोनीच्या टीकाकारांनी धोनीने निवृत्त व्हावे असा सल्ला दिला आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये हरल्यानंतर टीम इंडिया मायदेशी परतणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीची मुंबई येथे 17 आणि 18 जूलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय, 3 टी20 आणि दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड केली जाणार आहे. याअगोदरच धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नसल्याची चर्चा सुरु आहे.
बॅटिंग आणि विकेटकीपिंगप्रमाणे निवृत्त कधी व्हायचं हेसुद्धा मला कळतं - एमएस धोनी
निवड समितीला धोनीची प्रतीक्षा
याबाबत निवड समितीशी सुत्रांनी बातचित केली असता, निवड समितीने धोनीच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या निवडीबाबत आणि निवृत्तीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. तसेच निवड समितीला धोनीची प्रतीक्षा आहे. धोनीशी बातचित केल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील, असे सांगण्यात आले आहे. संघ पुढील काही तासांत भारतात दाखल होईल, असेही सांगण्यात आले आहे.
MS Dhoni Retirement : धोनीच्या अखेरच्या सामन्याविषयी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचं भाकित
या खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता
सातत्याने सामने खेळत असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला वन-डे आणि टी20 मालिकेत आराम दिला जाईल. तर त्याच्याऐवजी रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. तर विराट कोहली कसोटी मालिकेसाठी संघात सहभागी होईल. विराटसह जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनादेखील आराम दिला जाण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ : धोनी निवृत्ती केव्हा घेणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement