एक्स्प्लोर

लियोनेल मेस्सीचा जन्म आसाममध्ये झालाय; काँग्रेस खासदाराच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या

Argentina vs France Final: मेस्सीचा जन्म अर्जेंटिनात नाहीतर आसाममध्ये झालाय, काँग्रेस खासदाराच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.

Argentina vs France Final: जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत अर्जेंटिनानं फ्रान्सवर मात करत जेतेपद पटकावलं. अर्जेंटिनानं 36 वर्षांनी फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup)  वर आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा पराभव केला. तेव्हापासून अर्जेंटिना आणि त्याचा कर्णधार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) यांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. अर्जेंटिनाच्या विजयाचा भारताच्या अनेक भागात जल्लोष साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर मेस्सीवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. 

तसं पाहिलं तर मेस्सीचे चाहते संपूर्ण जगभरात आहेत. भारतातही मेस्सीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. भारतीय चाहत्यांकडूनही मेस्सीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण याच दरम्यान, आसाममधील एका काँग्रेस खासदारानं मेस्सीसंदर्भात केलेलं वक्तव्य भलतंच चर्चेत आलं आहे. मेस्सीचं भारत कनेक्शन सापडलं आहे. मात्र, मेस्सीचा भारताशी संबंध जोडणंच काँग्रेसच्या खासदाराला महागात पडलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे. 

ट्वीट डिलीट करूनही दिलासा नाही 

आसाम काँग्रेसचे खासदार अब्दुल खालिक (Congress MP Abdul Khaliq) यांनी ट्विटरवर मेस्सीचं अभिनंदन केलं आणि लिहिलं की, तुमचं मनापासून अभिनंदन, आम्हाला तुमच्या आसाम (Aasam) कनेक्शनचा अभिमान आहे. खालिक यांनी मेस्सीच्या आसाम कनेक्शनबाबत उल्लेख केल्यानंतर एका युजरनं नेमकं मेस्सी आणि आसामचं कनेक्शन काय? अशी विचारणा त्यांना केली. त्यावेळी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीचा जन्म भारताच्या आसाममध्ये झाल्याचा दावा त्यांनी केला. त्याच्या या ट्वीटनंतर यूजर्स खालिक यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत.

काँग्रेस खासदाराच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत ट्रोल करण्यास सुरुवात केली. ट्रोल होत असल्याचं पाहून त्यांनी त्यांचं ट्वीट डिलीट केलं. पण खालिक यांना त्यांची चूक लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता. लोकांनी त्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट घेतले आणि सोशल मीडियावर शेअर केले. याआधी तृणमूल काँग्रेसचे नेते रिजू दत्ता यांनी मेस्सीचं बंगाल कनेक्शन सांगितलं होतं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये हा विजय अर्जेंटिनाचा नसून तृणमूल काँग्रेसचा आहे… जय बांगला, असं ट्वीट केलं होतं. 

अर्जेंटिनानं 36 वर्षांचा दुष्काळ संपवला 

अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचं फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनानं (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्याआधी हा सामना जादा वेळेत 3-3 असा आणि निर्धारित वेळेत 2-2 असा बरोबरीत सुटला होता. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही तिसरी वेळ ठरली. याआधी अर्जेंटिनानं 1978 आणि 1986 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनानं विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIFA Prize Money: फक्त विजेताच नाहीतर, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला मिळणार किती Prize Money?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget