एक्स्प्लोर
स्टार फुटबॉलपटू लायनेल मेसी लग्नाच्या बेडीत
ब्यूनस आयर्स (अर्जेंटिना): अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लायनेल मेसी नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. मेसीनं आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीशीच लगीनगाठ बांधली आहे. अर्जेंटिनातील रोसारिओ येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी 30 वर्षीय मेस्सी आणि 29 वर्षी एंटोनेला रोकुजो यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
2008 सालापासून दोघेही एकत्रच राहत होते. मेसी आणि एंटोनेला यांना लग्नाआधीच दोन मुलं आहेत. त्यांचा एक मुलगा 4 वर्षाचा आहे तर दुसरा मुलगा दीड वर्षाचा आहे. मेसी आणि एंटोनेला हे मागील 25 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. वयाच्या 5व्या वर्षापासून ते एकमेकांचे मित्र आहेत.
(AP Photo/Victor R. Caivano)
दरम्यान, मेसीच्या लग्नाला तब्बल 250 हून अधिक जणांनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेक बडे फुटबॉल स्टार होते. या सोहळ्यासाठी तब्बल 450 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते. तसेच जगभरातून अनेक पत्रकारांना यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नाला पॉप स्टार शकीरा, फुटबॉलपटू लुइस सुआरेज आणि नेमार देखील उपस्थित होते.
संंबंधित बातम्या :
लायनेल मेसी रिटर्न्स, निवृत्तीचा निर्णय दोन महिन्यातच मागे
टॅक्स चोरी प्रकरणी मेसी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार
मेसी, निर्णय मागे घे, राष्ट्राध्यक्षांची विनंती
स्टार फुटबॉलपटू लायनल मेसी अडचणीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement