एक्स्प्लोर

मेसी आणि रोनाल्डोची एकाच दिवशी विश्वचषकातून एक्झिट!

रशियातला विश्वचषक हा मेसी आणि रोनाल्डोच्या कारकीर्दीतला चौथा विश्वचषक होता. मेसी आज 31 वर्षांचा, तर रोनाल्डो 33 वर्षांचा आहे.

मॉस्को : अर्जेंटिनाचा लायनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन बड्या फुटबॉलवीरांचं फिफा विश्वचषकाचं स्वप्न अखेर अधुरंच राहिलं. मेसीच्या अर्जेंटिनाचं आणि रोनाल्डोच्या पोर्तुगालचं आव्हान विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. रशियातला विश्वचषक हा मेसी आणि रोनाल्डोच्या कारकीर्दीतला चौथा विश्वचषक होता. मेसी आज 31 वर्षांचा, तर रोनाल्डो 33 वर्षांचा आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात ते दोघं खेळतील का, याविषयी शंकाच आहे. उरुग्वेकडून पोर्तुगालचा पराभव दियागो गॉडिनच्या उरुग्वेने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा 2-1 असा पराभव करून, फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या सामन्यात एडिन्सन कॅवानी हा उरुग्वेच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानेच उरुग्वेच्या दोन्ही गोल्सची नोंद केली. लुई सुआरेझने सातव्या मिनिटाला दिलेल्या पासवर कॅवानीने हेडरवर उरुग्वेचं खातं उघडलं. मग पेपेनेही हेडरवरच 55 व्या मिनिटाला पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. पण कॅवानीने सात मिनिटात दुसरा वैयक्तिक गोल डागून उरुग्वेला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. उरुग्वेच्या पोलादी बचावाने ती आघाडी अखेर निर्णायक ठरवली. फ्रान्सकडून अर्जेंटिनाला कडवी झुंज फ्रान्स जिंकला. अर्जेंटिना हरली. पण या सामन्यातल्या सात गोल्सनी आणि उभय संघांच्या फुटबॉलकौशल्याने जगभरच्या क्रीडारसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. रशियातल्या फिफा विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सने गतवेळच्या उपविजेत्या अर्जेंटिनाचा कडवा संघर्ष 4-3 असा मोडून काढला. पण या सामन्यात सरशी ही फुटबॉलची झाली. या सामन्यात कर्णधार ग्रिझमनने तेराव्या मिनिटाला फ्रान्सचं खातं उघडलं. त्याने पेनल्टीवर गोलची नोंद केली. मग एंजल डी मारियाने 41 व्या मिनिटाला अर्जेंटिनाला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात 48 व्या मिनिटाला मेसीच्या शॉटवर मर्काडोने अर्जेंटिनाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर या सामन्यावर फ्रान्सने वर्चस्व गाजवलं. पॅवार्डने 57 व्या मिनिटाला फ्रान्सला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. मग किलियान एमबापेने चार मिनिटांत दोन गोल डागून फ्रान्सची आघाडी 4-2 अशी वाढवली. अर्जेंटिनाच्या सर्जियो अॅग्वेरोने एन्जुरी टाईममध्ये गोल झळकावून फ्रान्सची आघाडी 4-3 अशी कमी केली. पण तोवर खूप उशीर झाला होता. फ्रान्सने 4-3 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

S. Sreesanth on Harbhajan Singh: 'त्यानं एक कोटी कमावलेत..' 18 वर्षांपूर्वीच्या वादाला नव्याने फोडणी; आयपीएलमध्ये कानाखाली खालेल्या श्रीसंतनं हरभजनला इन्स्टावर ब्लॉक का केलं? पुन्हा का भडकला?
'त्यानं एक कोटी कमावलेत..' 18 वर्षांपूर्वीच्या वादाला नव्याने फोडणी; आयपीएलमध्ये कानाखाली खालेल्या श्रीसंतनं हरभजनला इन्स्टावर ब्लॉक का केलं? पुन्हा का भडकला?
Virat Kohli: चौकारांपासून षटकारांपर्यंत! किंग कोहली वयाच्या 37व्या वर्षी आयपीएलच्या मैदानात असा भीम पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
चौकारांपासून षटकारांपर्यंत! किंग कोहली वयाच्या 37व्या वर्षी आयपीएलच्या मैदानात असा भीम पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
RCB vs GT IPL 2026 : गुजरातचा 'सुदर्शन' वार ठरला निष्फळ! विराटने दाखवला इंगा, गुजरातचा सलग दुसरा पराभव; चिन्नास्वामीवर आरसीबीचा शेवट गोड
गुजरातचा 'सुदर्शन' वार ठरला निष्फळ! विराटने दाखवला इंगा, गुजरातचा सलग दुसरा पराभव; चिन्नास्वामीवर आरसीबीचा शेवट गोड
RCB vs GT IPL 2026 : चिन्नास्वामीवरील शेवटच्या सामन्यात कोहलीची ‘विराट’ खेळी; आरसीबीने गुजरातचा धुव्वा उडवला
चिन्नास्वामीवरील शेवटच्या सामन्यात कोहलीची ‘विराट’ खेळी; आरसीबीने गुजरातचा धुव्वा उडवला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : भाजप हा बकासूर! 'आप' खासदारांच्या भाजप प्रवेशावर संजय राऊत कडाडले
Sandeep Deshpande On Sanjay Nirupam : निरुपमांचं अमराठी रिक्षाचालकांना समर्थन, देशपांडेंनी सुनावलं
Gym Warning Special Report : व्यायामाचा अतिरेक, जीवाला धोका, तरुण थोडक्यात बचावला
Ajit Pawar NCP Special Report : दादांचा पक्ष, तिघांचं लक्ष, कुणावर काय जबाबदारी?
Auto Marathi Contro Special Report : मराठीची अट, शिवसेनेचे दोन गट, मराठी सक्तीच्या निर्णयाने वाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
S. Sreesanth on Harbhajan Singh: 'त्यानं एक कोटी कमावलेत..' 18 वर्षांपूर्वीच्या वादाला नव्याने फोडणी; आयपीएलमध्ये कानाखाली खालेल्या श्रीसंतनं हरभजनला इन्स्टावर ब्लॉक का केलं? पुन्हा का भडकला?
'त्यानं एक कोटी कमावलेत..' 18 वर्षांपूर्वीच्या वादाला नव्याने फोडणी; आयपीएलमध्ये कानाखाली खालेल्या श्रीसंतनं हरभजनला इन्स्टावर ब्लॉक का केलं? पुन्हा का भडकला?
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात! मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर
पालघरमध्ये भीषण अपघात! मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या पुलाला हायवा ट्रकची जोरदार धडक, चालक गंभीर
Virat Kohli: चौकारांपासून षटकारांपर्यंत! किंग कोहली वयाच्या 37व्या वर्षी आयपीएलच्या मैदानात असा भीम पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
चौकारांपासून षटकारांपर्यंत! किंग कोहली वयाच्या 37व्या वर्षी आयपीएलच्या मैदानात असा भीम पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून 'वदवून घेतलेला' चुकीचा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही; अशी हिंमत मुर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न; अमोल मिटकरींचा सडकून प्रहार
बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून 'वदवून घेतलेला' चुकीचा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही; अशी हिंमत मुर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न; अमोल मिटकरींचा सडकून प्रहार
Iran War Live Update: इराणचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये दाखल, पण अमेरिकेशी फेस टू फेस चर्चा होणार की नाही? दोन्ही बाजूंच्या दाव्यांमधील मतभेद अधोरेखित
इराणचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये दाखल, पण अमेरिकेशी फेस टू फेस चर्चा होणार की नाही? दोन्ही बाजूंच्या दाव्यांमधील मतभेद अधोरेखित
Sandeep Deshpande: 'दिघे साहेब असते तर कानाखाली...', संजय निरुपम मनसे राड्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, म्हणाले 'भैय्या लोक मराठी शिकायला तयार पण...'
'दिघे साहेब असते तर कानाखाली...', संजय निरुपम मनसे राड्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, म्हणाले 'भैय्या लोक मराठी शिकायला तयार पण...'
Anshuman Vichare: 'मराठी मातीत कमवून माज करायचा नाही..' मराठी अभिनेत्याची रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला..
'मराठी मातीत कमवून माज करायचा नाही..' मराठी अभिनेत्याची रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला..
Sanjay Gaikwad: आंबी कुटुंबीयांचा विरोध असूनही संजय गायकवाडांविरोधात 'अदखलपात्र' गुन्हा, चळवळीतील कार्यकर्ते आज अप्पर पोलीस अधीक्षकांची घेणार भेट
आंबी कुटुंबीयांचा विरोध असूनही संजय गायकवाडांविरोधात 'अदखलपात्र' गुन्हा, चळवळीतील कार्यकर्ते आज अप्पर पोलीस अधीक्षकांची घेणार भेट
Embed widget